WC2019 : धवनच्या जागी पंतचा भारतीय संघात समावेश, ICC ने दिली मंजूरी - BCCI
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती
लंडन - भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे आयसीसी विश्वकरंडक २०१९ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. धवनच्या जागी आता भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संघात स्थान दिले आहे.
ऋषभला भारताच्या १५ सदस्यीय संघात देण्यात यावे यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) अपील केली होती. त्यावर निर्णय देताना आयसीसीने धवनच्या जागी पंतची भारताच्या 15 सदस्यीय संघात सामवेश करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पंत आता अधिकृतरीत्या विश्वकरंडकात भारतीय संघाचा भाग असणार आहे.
विश्वकरंडकासाठी आता असा असेल भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
SPO 01
Conclusion: