नवी दिल्ली - भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ट्विटरवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही मुले क्रिकेट खेळताना दिसत असून या मुलांनी डिसिजन रीव्यू सिस्टमला (डीआरएस) एका वेगळ्या पध्दतीने प्रदर्शित केले आहे.
या मजेशीर व्हिडिओमध्ये मुले गल्ली क्रिकेट खेळत आहेत. गोलंदाजाच्या अपीलनंतर पंच फलंदाजाला बाद घोषित करतो. तोपर्यंत फलंदाज डीआरएसचा वापर करतो. मात्र, इथे तंत्रज्ञानाचा वापर न करता मुलांनी खास प्रकारे डीआरएसचा उपयोग केला आहे.
-
I can’t stop laughing!!! Lmao 😂 😂😂😂 pic.twitter.com/xO14GmKnNQ
— Ashwin (During Covid 19)🇮🇳 (@ashwinravi99) May 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I can’t stop laughing!!! Lmao 😂 😂😂😂 pic.twitter.com/xO14GmKnNQ
— Ashwin (During Covid 19)🇮🇳 (@ashwinravi99) May 30, 2020I can’t stop laughing!!! Lmao 😂 😂😂😂 pic.twitter.com/xO14GmKnNQ
— Ashwin (During Covid 19)🇮🇳 (@ashwinravi99) May 30, 2020
यात, मुलांनी स्लो मोशनमध्ये प्रक्रिया केल्या आहेत. टीव्ही रीप्ले प्रमाणेच गोलंदाज आणि फलंदाजाची कृती या मुलांनी व्हिडिओमध्ये दाखवली आहे. शेवटी या डीआरएसच्या निर्णयामध्ये फलंदाजाला नाबाद ठरवले जाते.
असे मनोरंजक व्हिडिओ क्रिकेटपटू त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बर्याचदा शेअर करत असतात. सध्या कोरोना विषाणूमुळे काही स्पर्धा रद्द केल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.