ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, 'राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात होणार सहभागी - PM Narendra Modi Wardha Tour

PM Narendra Modi Wardha Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (20 सप्टेंबर) रोजी वर्धा जिल्ह्याच्या (Wardha) दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजने'चा (National PM Vishwakarma Program) वर्षपूर्ती सोहळा पार पडणार आहे.

PM Narendra Modi Wardha Tour
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा दौऱ्यावर (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 7:51 PM IST

Updated : Sep 20, 2024, 6:59 AM IST

नागपूर PM Narendra Modi Wardha Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (20 सप्टेंबर) वर्धा जिल्ह्याला (Wardha) भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी 'राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात (National PM Vishwakarma Program) सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. या योजनेअंतर्गत कारागीरांना दिलेल्या प्रत्यक्ष पाठिंब्याचं प्रतीक म्हणून, ते 18 प्रकारच्या व्यापारातील 18 लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा अंतर्गत पतपुरवठा वितरित करतील. या कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल, पंतप्रधानांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका 'स्मृती टपाल तिकिटा'चं अनावरणदेखील केलं जाणार आहे.

पीएम मित्र पार्क उभारण्याला मंजुरी : या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती येथे 'प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल' (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातर्फे राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून ही पार्क 1 हजार एकरात उभारण्यात येत आहे. सरकारनं वस्त्रोद्योगासाठी सात पीएम मित्र पार्क उभारण्याला मंजुरी दिली आहे. भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. या पार्कमुळं थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि रोजगार वाढेल.

निर्मितीला प्रोत्साहन मिळेल : पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' योजनेचा शुभारंभ करतील. राज्यातील 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं राज्यभरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये 'कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे' स्थापन करण्यात येणार आहे. ज्यामुळं राज्यातील 1,50,000 युवक-युवतींना दरवर्षी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण मिळू शकेल.

'या' योजनेचा होणार शुभारंभ : पंतप्रधानांच्या हस्ते "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा" शुभारंभ होणार आहे. या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील नवउद्यमी स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मदत दिली जाईल, ही 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. योजनेतील एकूण तरतुदीच्या 25 टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरीता राखीव ठेवण्यात येईल. या योजनेमुळं महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना स्वावलंबी होऊन स्वतंत्रपणे कार्य करता येईल.

हेही वाचा -

  1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक ते पंतप्रधान पद, नरेंद्र मोदींच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावला? - narendra modi birthday
  2. नरेंद्र मोदी यांची ब्रुनेई सिंगापूर भेट: इंडो-पॅसिफिकमधील प्रादेशिक संतुलनासाठी झाली महत्त्वपूर्ण चर्चा - Modi Visit to Brunei and Singapore
  3. पंतप्रधान मोदींची सिंगापूरमध्ये सेमीकंडक्टर कंपनीला भेट, दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी - PM Narendra Modi

Last Updated : Sep 20, 2024, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.