ETV Bharat / sports

सोन्याचं घड्याळं, दागिने, आयफोन... क्रिकेटमधील अजब-गजब पुरस्कार, 'या' स्पर्धेत तर मिळाली होती अर्धा एकर जमीन - Bizarre Post Match Awards - BIZARRE POST MATCH AWARDS

Cricket's Bizarre Post-Match Player Awards : क्रिकेटच्या मैदानावर खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार दिला जातो. मात्र अनेक वेळी खेळाडूंना अजब-गजब पुरस्कार मिळाले आहेत.

Bizarre Post-Match Player Awards
क्रिकेटमधील अजब-गजब पुरस्कार (ETV Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 19, 2024, 7:39 PM IST

मुंबई Cricket's Bizarre Post-Match Player Awards : विस्डेन क्रिकेट वेबसाइटनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटपटूंना पुरस्कार देण्याची संकल्पना जवळजवळ 1968 च्या ऍशेसमध्ये सुरु झाली. प्रत्येक कसोटी सामन्यात प्रत्येक संघासाठी ‘बॅट्समन ऑफ द मॅच’ आणि ‘बॉलर ऑफ द मॅच’ निवडण्यात येतो. त्या मालिकेतील पाच कसोटी सामन्यांनंतर, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक म्हणून नावाजले गेले. तसंच खेळात प्रायोजक आल्यानं पुरस्कार वाढले. तथापि, प्रत्येक पुरस्कार परंपरागत नाही. मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करून खेळाडूंना विचित्र पुरस्कार मिळाल्याची उदाहरणे यापूर्वी घडली आहेत. अशाच काही अजब-गजब पुरस्कारांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हॅट आणि डिक्शनरी एंट्री : 1858 मध्ये, ऑल-इंग्लंड इलेव्हन शेफिल्डमधील हायड पार्क इथं सशक्त हॅलम संघाशी खेळत होता. सामन्यानंतर, एचएच स्टीफनसन, उत्कृष्ट व्यावसायिक, ज्यानं चौथ्या डावात सलग बॉलमध्ये तीन विकेट्ससह विजयासाठी योगदान दिलं. स्टीफन्सनला मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली टोपी (हॅट) दिली गेली.

सोन्याचं घड्याळं आणि दागिने : 1996 च्या टायटन चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला (ज्यात ऑस्ट्रेलिया देखील होते), परंतु सर्वांच्या नजरा 'टायटन्सचा टायटन' ॲलन डोनाल्डवर होत्या. कारण त्याला दोन सोन्याची घड्याळे आणि दागिन्यांचा सेट देण्यात आला होता.

नागरिकत्व बहाल करण्यात आलं : 2007 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सहा सामने बॅसेटेरे, सेंट किट्स आणि नेव्हिस येथील वॉर्नर पार्कनं आयोजित केले होते. यापैकी दुसऱ्यामध्ये, हर्शल गिब्स हा नेदरलँड्सच्या दान व्हॅन बुंगेच्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. सहाव्या सामन्यात, मॅथ्यू हेडननं 66 चेंडूत शतक पूर्ण केलं, त्या वेळी विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक होतं. परिणामी दोन्ही खेळाडूंना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. इतकंच नव्हे तर सेंट किट्स आणि नेव्हिस सरकारनं दोघांनाही नागरिकत्व बहाल केलं.

इलेक्ट्रिक ब्लेंडर : 2012/13 ढाका प्रीमियर लीगमध्ये इंग्लिश अष्टपैलू खेळाडू ल्यूक राइट, बांग्लादेशमधील ढाका प्रीमियर लीगमधील लीग सामन्यात सामनावीर कामगिरी केल्याबद्दल इलेक्ट्रिक ब्लेंडर प्रदान करण्यात आला.

राइस कुकर : इंग्लंडचा माजी 2019 एकदिवसीय-विजेता कर्णधार इऑन मॉर्गनला ढाका प्रीमियर लीगमध्ये राइस कुकर मिळाला होता. 2013 मध्ये, त्यानं ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळताना सामना जिंकणारी खेळी केली. त्याच्या खेळीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले. मात्र, बक्षीस म्हणून राइस कुकर देण्यातं आलं.

Bizarre Post-Match Player Awards
स्नॅक्स (Getty Images)

स्नॅक्स : 2017 मध्ये, कॅरिबियन प्रीमियर लीगनं प्लेअर ऑफ द मॅचसाठी थोडेसं अपारंपरिक बक्षीस जाहीर केलं. त्यांनी सामनावीर खेळाडूला स्नॅक देण्याची घोषणा केली. बहुतेक ऍथलीट्ससाठी फिटनेसला प्राधान्य असलेल्या युगात पुरस्काराची निवड थोडीशी शंकास्पद आहे.

बिस्किट ट्रॉफी : 2018 मध्ये UAE मध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा धुव्वा उडवल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेटमधील सर्वात वाईट डिझाइन केलेल्या ट्रॉफीचा मानद विजेता ठरला.

मासा : 2020 मध्ये काश्मीरमधील एका क्रिकेट स्पर्धेत सामनावीर खेळाडूला मासा पुरस्कार म्हणून देण्यात आला. टेकीपोरा कुपवाडा इथं झालेल्या क्रिकेट सामन्यात 2.5 किलो वजनाच्या मासा सामनावीर पुरस्कार म्हणून देण्यात आला.

इंधन : 2021 मध्ये भारतात पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्यानं भोपाळमधील क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकांनी अंतिम सामन्यातील खेळाडूसाठी पाच लिटर पेट्रोलचं बक्षीस जाहीर केलं.

पेंट (कलर) : 2022/23 मध्ये न्यूझीलंडनं श्रीलंकेविरुद्ध 2-0 असा विजय मिळवून घरच्या मैदानावर 12 अपराजित कसोटी मालिका जिंकल्या. या मालिकेत केन विल्यमसन काही सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. ड्युलक्स या प्रायोजकांनी त्याला चक्क 150 लिटर पेंट (कलर) दिलं.

अर्धा एकर जमीन : वेस्ट इंडीजच्या शेरफेन रदरफोर्डनं 2023 च्या ग्लोबल T20 लीगमध्ये अनेक पुरस्कार जिंकले. त्याला नेहमीच्या रोख पुरस्कारांसोबत प्लेअर ऑफ द सिरीजसाठी USA मध्ये अर्धा एकर जमीन देण्यात आली होती.

जमीन आणि आयफोन : अफगाणिस्तानच्या रशीद खानच्या शानदार गोलंदाजीमुळं लाहोर कलंदरनं क्वेटा ग्लॅडिएटर्सला 2023 पीएसएलमध्ये पराभूत केलं. यानंतर त्याला आयफोन 14 देण्यात आला. तर दुसरीकडे झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू सिकंदर रझानं ज्याने त्याच्या 34 चेंडूत नाबाद 71 धावा केल्याबद्दल सामनावीर ठरला. यावेळी रझाला पाकिस्तानमध्ये एक भूखंड देण्यात आला.

गिटार पुरस्कार : 2023 मध्ये, वेस्ट इंडिजनं पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताचा पराभव केला. या मालिकेत निकोलस पूरननं सर्वाधिक 11 षटकार मारले. त्यासाठी त्याला सेमिनोल हार्ड रॉक हॉलिवूडकडून गिटार देण्यात आलं.

हेही वाचा :

  1. कधी होणार IPL 2025 चा मेगा लिलाव? समोर आली मोठी अपडेट - IPL Mega Auction Update
  2. WATCH: 21 वर्षीय फलंदाजानं मारला 124 मीटर लांब षटकार, तरीही इतिहास रचण्यास हुकला - 124 Meter Six

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.