दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबने हैदराबादचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. खेळपट्टीवर अधिक काळ टिकण्यात कुणालाच यश आले नाही. या दरम्यान, पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या विकेटचीच चर्चा होत आहे. हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानने फेकलेली फिरकी त्याला समजलीच नाही आणि तो त्रिफळाचित झाला.
-
Rashid Khan's Beauty to Dismiss KL Rahul. #IPL2020 #SRH #KKR pic.twitter.com/93M2ChW6v6
— R5 Cricket Videos 🏏🇮🇳 (@R5Cricket) October 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rashid Khan's Beauty to Dismiss KL Rahul. #IPL2020 #SRH #KKR pic.twitter.com/93M2ChW6v6
— R5 Cricket Videos 🏏🇮🇳 (@R5Cricket) October 24, 2020Rashid Khan's Beauty to Dismiss KL Rahul. #IPL2020 #SRH #KKR pic.twitter.com/93M2ChW6v6
— R5 Cricket Videos 🏏🇮🇳 (@R5Cricket) October 24, 2020
घडले असे की, पंजाबच्या डावाच्या ११व्या षटकात राशिद खान गोलंदाजीसाठी आला. तेव्हा समोर केएल राहुल २७ धावांवर खेळत होता. राशिदने राहुलला फ्लाइटेड चेंडू फेकला. त्या चेंडूवर राहुलले ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. परंतु टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू आत वळला आणि थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. राहुलला हा चेंडू समजलाच नाही. काही काळ राहुलला समजू शकले नाही की तो त्रिफळाचित कसा झाला.
दरम्यान, या क्षणाचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या चेंडूला मॅजिक बॉल असे नाव देण्यात आले आहे. राशिद खानने आतापर्यंत १३व्या हंगामात १४ बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी दर इतर गोलंदाजांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. आयपीएल २०२० मध्ये राशिद खानचा इकॉनॉमी दर ५.३० आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने हैदराबादवर १२ धावांनी मात केली. पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १२७ धावांचे आवाहन दिले होते. मात्र, तरी देखील हैदराबादच्या संघाला पंजाबवर मात करता आली नाही. हैदराबादचा पूर्ण संघ १९.४ षटकांत ११४ धावा करु शकला. हैदराबादकडून फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने २० चेंडूंत ३५ धावा केल्या. तर विजय शंकर याने २७ चेंडूंत २६ धावा केल्या.