मुंबई - सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सौराष्ट्रने उपांत्य फेरीत गुजरातवर ९२ धावांनी विजय मिळवला. अंतिम फेरीत सौराष्ट्रची भिडत बंगालशी होणार आहे. उपांत्य सामन्यात उनाडकटने १० गडी टिपले.
उपांत्य सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सौराष्ट्रने शेल्डन जॅक्सनच्या शतकी खेळाच्या जोरावर पहिल्या डावात ३०४ धाव्या केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल गुजरातचा संघ पहिल्या डावात २५२ धावांपर्यंत मजल मारू शकला.
दुसऱ्या डावात सौराष्ट्रची अवस्था १५ धावांवर ५ गडी बाद अशी झाली. तेव्हा मधल्या फळीत चेतन सकारियाच्या ४५ धावा, अर्पित वसवडाचे शतक झळकावत संघाचा डाव सावरला. त्यांना चिराग जानीने अर्धशतक झळकावत चांगली साथ दिली. या तिघांच्या खेळीच्या जोरावर सौराष्ट्राला २७४ धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात गुजरातकडून चिंतन गजाने ७ बळी घेतले. सौराष्ट्रने गुजरातसमोर विजयासाठी ३२७ धावांचे आव्हान ठेवले.
कर्णधार उनाडकटच्या भेदक गोलंदाजीसमोर दुसऱ्या डावात गुजरातच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकवेळ गुजरातची अवस्था ५ बाद ६३ अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार पार्थिव पटेल आणि चिराग गांधीने अनुक्रमे ९३ आणि ९६ धावांची खेळी करत चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र सौराष्ट्रच्या गोलंदाजांसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. कर्णधार उनाडकटने दुसऱ्या डावात ७ बळी घेतले.
-
Saurashtra hold their nerve in a thriller against Gujarat and reach the @paytm #RanjiTrophy 2019-20 final.👌
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard 👉 https://t.co/bL3yaUUHOc#GUJvSAU @saucricket pic.twitter.com/Y46g6VeqBb
">Saurashtra hold their nerve in a thriller against Gujarat and reach the @paytm #RanjiTrophy 2019-20 final.👌
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 4, 2020
Scorecard 👉 https://t.co/bL3yaUUHOc#GUJvSAU @saucricket pic.twitter.com/Y46g6VeqBbSaurashtra hold their nerve in a thriller against Gujarat and reach the @paytm #RanjiTrophy 2019-20 final.👌
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 4, 2020
Scorecard 👉 https://t.co/bL3yaUUHOc#GUJvSAU @saucricket pic.twitter.com/Y46g6VeqBb
हा खेळाडू अंतिम सामन्यासाठी सौराष्ट्र संघात -
बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी सौराष्ट्र संघात चेतेश्वर पुजारा परतला आहे. त्याने गुजरातविरुद्धच्या विजयानंतर आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केलं. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत, मी अंतिम फेरीसाठी येतोय असा संदेश पुजाराने दिला आहे.