ETV Bharat / sports

अख्तरच्या भारत-पाक मालिका पर्यायाला आणखी एका पाक खेळाडूचा पाठिंबा - भारत-पाकिस्तान मालिका

शोएबच्या भारत-पाकिस्तान मालिकेच्या पर्यायाला पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीज राजा यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

Ramiz Raja says on India-Pakistan series
अख्तरच्या भारत-पाक मालिका पर्यायाला आणखी एका पाक खेळाडूने दर्शवला पाठिंबा
author img

By

Published : Apr 13, 2020, 4:46 PM IST

कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने, भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवून, या मालिकेतून मिळणारे उत्पन्नाचा वापर, कोरोना लढ्यात करावा, असा पर्याय सुचवला आहे. शोएबच्या या पर्यायाला पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीज राजा यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

रमीज राजा म्हणाले, भारत-पाकिस्तान सामन्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळतो. २०१९ च्या विश्वविश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना सुपर हिट ठरला. या सामन्याला सर्वाधिक प्रेक्षकांची उपस्थिती होती. लाईव्ह देखील हा सामना सर्वाधिक पाहिला गेला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या भारत-पाकिस्तान सामने व्हायला हवेत. चाहत्यांनीच आता भारत-पाक सामने तटस्थ ठिकाणी खेळवायचा आग्रह धरायला हवा.'

भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटमुळे इतका तणाव का असतो माहित नाही. आपण क्रिकेटच्या माध्यमातून एकमेकांना जाणून घेऊ शकतो, असेही रमीज राजा म्हणाले. दरम्यान, शोएबने कोरोना लढ्याच्या मदतनिधीसाठी भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला आहे. त्यांच्या या पर्यायावर कपिल यांनी भारताला निधीसाठी क्रिकेट खेळवण्याची गरज नाही, तर मदनलाल यांनी क्रिकेटचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असे म्हटले आहे.

यावर कपिल यांना उत्तर देताना शोएबने, मला काय म्हणायचे आहे हे कपिल भाईंना समजलेले नाही. कोरोनामुळे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्व मुद्दे बाजूला ठेवून पैसा कसा निर्माण होईल याचा विचार करणे सद्य घडीला गरजेचे आहे. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी, जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या उड्या पडतात. कपिल भाईं म्हणले की, आम्हाला पैशाची गरज नाही, कदाचित त्यांना पैशांची गरज नसेल पण इतरांना नक्कीच आहे, असे म्हटले आहे.

हेही वाचा - “तुम्ही अजून खरा त्रास पाहिलेला नाही”, सेहवागने दिला भारतीयांना संदेश

हेही वाचा - शाकिब आयसोलेशननंतर पोहोचला घरी, केला शेअर पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.