नवी दिल्ली - मुंबईचा युवा खेळाडू पृथ्वी शॉवरिल आठ महिन्यांची बंदी येत्या १६ नोव्हेंबरला संपणार आहे. यामुळे सय्यद मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाच शॉची निवड करण्यात येऊ शकते. याबद्दलचे संकेत मुंबई क्रिकेट असोसिएशनने संकेत दिले आहे. दरम्यान, शॉ डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती.
पृथ्वी शॉने कफ सिरप घेतले होते. या सिरपमध्ये 'टर्बुटेलाइन' हे प्रतिबंधित द्रव्य आढळल्याने आंतरराष्ट्रीय अॅन्टी डोपिंग नियमानुसार त्याच्यावर १५ मार्च २०१९ पासून आठ महिन्यांची तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.
महत्वाचे म्हणजे, आज पृथ्वी शॉचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी पृथ्वीला एमसीए निवड समितीकडून दिलासादायक वृत्त मिळाले आहे. अद्याप सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघाची निवड घोषित झालेली नाही. त्यामुळे निवड समिती मुंबई संघातील निवडीसाठी पृथ्वीच्या नावाचा विचार करणार असे संकेत आहेत.
निवड झाली तरी शॉ सहा लढतीला मुकणार -
पृथ्वी शॉची शिक्षा १६ नोव्हेंबरला संपणार आहे. तर तोपर्यंत सय्यद मुश्ताक अली चषक क्रिकेट स्पर्धेच्या गट फेरीतील मुंबई संघाच्या ६ लढती होणार आहे. यामुळे शॉला या सहा लढतीत संधी मिळणार नाही.
हेही वाचा - INDvsBAN : तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघ नागपुरात दाखल
हेही वाचा - IND vs BAN २nd T२० : रोहितची फटकेबाजी, बांगलादेशचा धुव्वा; टीम इंडियाची मालिकेत बरोबरी