मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सिडलने वयाच्या ३५ व्या वर्षी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी लढतीपूर्वी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, सिडलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी स्थानिक स्पर्धांमध्ये तो खेळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी पीटर सिडलची निवड करण्यात आली होती, मात्र त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे तिसऱ्या लढतीसाठी संघ निवडीपूर्वीच सिडल याने निवृत्तीचा निर्णय घेतला. निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी कर्णधार टीम पेन आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्याशी आपण चर्चा केली होती, असे सिडलने स्पष्ट केले आहे.
-
🎩🎩🎩
— ICC (@ICC) December 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
An #Ashes hat-trick at the Gabba on your birthday – it does not get better than this!
Happy retirement, @petersiddle403 🙌pic.twitter.com/GO3hAAAEA2
">🎩🎩🎩
— ICC (@ICC) December 28, 2019
An #Ashes hat-trick at the Gabba on your birthday – it does not get better than this!
Happy retirement, @petersiddle403 🙌pic.twitter.com/GO3hAAAEA2🎩🎩🎩
— ICC (@ICC) December 28, 2019
An #Ashes hat-trick at the Gabba on your birthday – it does not get better than this!
Happy retirement, @petersiddle403 🙌pic.twitter.com/GO3hAAAEA2
आपल्या निवृत्ती विषयी सिडल म्हणाला, 'क्रिकेटमध्ये कधी थांबायचे आणि कोणती वेळ योग्य हे कळणे अवघड आहे. पण माझे मुख्य उद्दिष्ठ अॅशेस मालिका खेळणे आणि जिंकणे होते.
दरम्यान, २००१ नंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच सलग दोनदा (२००१ आणि २०१९) अॅशेस मालिका जिंकण्याचा कारनामा केला. या संघामध्ये सिडल प्रमुख खेळाडू होता.
-
JUST IN: Australia pacer Peter Siddle has announced his retirement from international cricket.
— ICC (@ICC) December 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
👉 67 Tests
👉 20 ODIs
👉 2 T20Is
👉 241 wickets
Congratulations on a fantastic career 👏 pic.twitter.com/yWKS3JsbbE
">JUST IN: Australia pacer Peter Siddle has announced his retirement from international cricket.
— ICC (@ICC) December 28, 2019
👉 67 Tests
👉 20 ODIs
👉 2 T20Is
👉 241 wickets
Congratulations on a fantastic career 👏 pic.twitter.com/yWKS3JsbbEJUST IN: Australia pacer Peter Siddle has announced his retirement from international cricket.
— ICC (@ICC) December 28, 2019
👉 67 Tests
👉 20 ODIs
👉 2 T20Is
👉 241 wickets
Congratulations on a fantastic career 👏 pic.twitter.com/yWKS3JsbbE
सिडलने २००८ ला मोहाली येथे झालेल्या लढतीत कसोटीमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या ११ वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये ६७ कसोटी लढती खेळल्या. यात त्याने २२१ बळी घेतले. या दरम्यान एकाच डावाच पाच बळी घेण्याची कामगिरी त्याने आठ वेळा केली. यासह त्याने २० एकदिवसीय लढतींमध्ये १७ बळी घेतले आहेत.
हेही वाचा - नील वॅगनर...कसोटीत न्यूझीलंडकडून २०० बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज
हेही वाचा - VIDEO : स्टेनच्या गोलंदाजीवर एका षटकात ०,६,६,४,४ त्यानंतर मग...