नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीने आपल्या 'सर्वकालीन विश्वकरंडक संघा'ची निवड केली आहे. आश्चर्य म्हणजे आफ्रिदीने आपल्या या संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारतीय विश्वकरंडक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश केलेला नाही. मात्र सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आफ्रिदीने आपल्या संघात स्थान दिले आहे.
आफ्रिदीने मंगळवारी आपल्या सर्वकालीन विश्वकरंडक संघाची घोषणा केलीय. ज्यात सर्वाधिक ५ पाक क्रिकेटपटूंचा समावेश केलाय. तर त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या ४ आणि दक्षिण आफ्रिकेच्या आणि भारताच्या १-१ खेळाडूंचा समावेश केलाय. आफ्रिदिने आपल्या संघात श्रीलंकेच्या संघातील एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाहीय.
शाहीद आफ्रिदीचा सर्वकालीन विश्वकरंडक संघ
रिकी पॉन्टिंग, सईद अनवर, अॅडम गिलख्रिस्ट, विराट कोहली, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, वासिम अक्रम, ग्लेन मॅकग्राथ, शेन वॉर्न, शोएब अख्तर आणि सकलैन मुश्ताक.