ETV Bharat / sports

शाहीद आफ्रिदीचा लाजिरवाणा विक्रम, शून्यावर बाद होण्याचं पूर्ण केलं 'शतक' - Afridi completes a century of ducks

पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शाहीद आफ्रिदी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमध्ये मिळून तब्बल १०० वेळा शून्यावर बाद झाला आहे.

pakistan cricket player shahid Afridi completes a century of ducks
शाहिद आफ्रिदीचा लाजिरवाणा विक्रम, शून्यावर बाद होण्याचं पूर्ण केलं 'शतक'
author img

By

Published : Dec 14, 2019, 7:03 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या नावे एका 'नकोसा' विक्रमाची नोंद झाली आहे. शाहीदने शून्यावर बाद होण्याचे शतक पूर्ण केलं आहे. सध्या शाहीद बांगलादेश प्रीमीयर लीगमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत राजशाही रॉयल्स संघाविरुद्ध तो शून्यावर बाद झाला.

पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शाहीद आफ्रिदी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमध्ये मिळून तब्बल १०० वेळा शून्यावर बाद झाला आहे. ही आकडेवारी पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिली आहे. त्या आकडेवारीनुसार, आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. लाला या टोपण नावाने परिचित असलेल्या आफ्रिदीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०, कसोटीत ६ तर टी-२० मध्ये ८ वेळा भोपळा फोडता आलेला नाही. तर लीग क्रिकेटमध्ये आफ्रिदी ५६ वेळा शून्यावर बाद झाला.

  • Legendary all-rounder Shahid Afridi sets embarrassing record, completed a century of ducks.
    Dismissed for a duck 44 times in int cricket. With 30 ducks in ODIs, 06 times in Test, 08 times in T20Is. The other 56 ducks came from First-Class, List A and T20 cricket around the world. pic.twitter.com/NpEjUgUnUt

    — Syed Hasnain Abbas (@hasnainabbasyed) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसुर्याच्या नावे आहे. तो ३४ वेळा शून्यावर बाद झाला. ४४ वर्षीय आफ्रिदीने पाकिस्तान संघासाठी ३९८ एकदिवसीय, २७ कसोटी आणि ९९ टी-२० सामने खेळले आहेत. आफ्रिदीची गणना जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये करण्यात येते. त्याने अनेक सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीतही कमाल केली आहे.

हेही वाचा - 'धोनी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळेल यात कोणतीही शंकाच नाही'

हेही वाचा - अजब कसोटी सामना : दोन्ही संघ प्रत्येकी १० खेळाडूंसह मैदानात

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.