ETV Bharat / sports

#HBD AKHTAR : ... आणि शोएब अख्तरचा 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून उदय झाला

शोएब अख्तरचा आज ४४ वा वाढदिवस आहे.

#HBD AKHTAR : ... आणि शोएब अख्तरचा 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून उदय झाला
author img

By

Published : Aug 13, 2019, 1:10 PM IST

नवी दिल्ली - सध्याच्या टी-२० च्या युगामुळे फलंदाजांना सोन्याचे दिवस आले आहेत. आज कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करता येतात. त्यामुळे फलंदाजीमध्ये असे विक्रम हमखास पाहायला मिळतात. पण, असा एक काळ होता जेव्हा फलंदाज आपल्या बॅटने चेंडूला स्पर्श करायला घाबरत होते. गोलंदाजांनी टाकलेला तो वेगवान चेंडू कधीच त्रिफळा उद्ध्वस्त करुन जात होता. आज अशाच एका गोलंदाजाचा वाढदिवस आहे. या गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीमध्ये फलंदाजांची पळता भूई थोडी केली होती.

शोएबचा 'तो' वेगवान चेंडू -

पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरचा आज ४४ वा वाढदिवस आहे. शोएबचा सर्वात नावाजलेला विक्रम म्हणजे त्याने टाकलेला १६१.३ किमी/प्रतितासाचा तो चेंडू. २००३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने हा चेंडू टाकला होता. त्याआधी, क्रिकेटच्या मागील १०० वर्षाच्या इतिहासात असा चेंडू टाकणे कोणाला जमले नव्हते. पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबमधील रावळपिंडी येथे शोएब अख्तरचा जन्म झाला. १३ ऑगस्ट १९७५ ही त्याची जन्मतारीख.

बालपणीचा संघर्ष -

शोएबने क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली. रावळपिंडीच्या दुपारच्या रणरणत्या उन्हात तो मैदानावर आपल्या गोलंदाजीचा सराव करायचा. शोएबला उसाचा रस खूप आवडत असे. सराव करुन आल्यानंतर त्याला तो नेहमी तो प्यावासा वाटायचा पण त्याच्याकडे पैसे नसायचे. म्हणून तो दुकानदाराला 'मी मोठा झालो की, उसाच्या रसाचे नवीन यंत्र घेऊन देईन' असे सांगत असे. बऱ्याच विनंत्या केल्यानंतर, तो दुकानदार शोएबला फुकट रस द्यायचा. काळ निघून गेला आणि शोएब मोठा गोलंदाज झाल्यावर त्याने आपले वचन पूर्ण केले.

जगात 'रावळपिंडी एक्सप्रेसचा' उदय -

शोएबच्या वयात पाकिस्तानमध्ये अनेक वेगवान गोलंदाज तयार झाले. पाकिस्तान संघामध्ये गोलंदाजांची निवडप्रक्रिया सुरु होती. तेव्हा शोएबला त्या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा होता. जेव्हा तो मैदानावर पोहोचला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला काय करावे ते कळत नव्हते. कारण त्या निवडीसाठी २००० गोलंदाज आपले नशीब आजमवायला आले होते. या निवडीसाठी आपला नंबरच येणार नाही असे त्याला वाटले. म्हणून त्याने निवड करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या मोठ्या मैदानावर जोरात धावण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या त्या तापलेल्या उन्हात हा कोण वेडा धावतोय हे पाहून निवड करणाऱ्यांनी त्याला बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी तुला काय पाहिजे असे विचारल्यावर शोएबने आपल्याला एक संधी पाहिजे असे बोलून दाखवले. शोएबने ती संधी हेरली आणि त्यानंतर तो जगात 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाऊ लागला.

Intro:Body:

pakistan bowler shoaib akhtar 44 birthday today

cricketer birthday, shoaib akhtar birthday, 13th of august, pakistan fast bowler, रावळपिंडी एक्सप्रेस, शोएब अख्तर, HBD AKHTAR 

#HBD AKHTAR : ... आणि शोएब अख्तरचा 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून उदय झाला

नवी दिल्ली - सध्याच्या टी-२० च्या युगामुळे फलंदाजांना सोन्याचे दिवस आले आहेत. आज कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करता येतात. त्यामुळे फलंदाजीमध्ये असे विक्रम हमखास पाहायला मिळतात. पण, असा एक काळ होता जेव्हा फलंदाज आपल्या बॅटने चेंडूला स्पर्श करायला घाबरत होते. गोलंदाजांनी टाकलेला तो वेगवान चेंडू कधीच त्रिफळा उध्वस्त करुन जात होता. आज अशाच एका गोलंदाजाचा वाढदिवस आहे. या गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीमध्ये फलंदाजांची पळता भूई थोडी केली होती. 

शोएबचा 'तो' वेगवान चेंडू -

पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरचा आज ४४ वा वाढदिवस आहे. शोएबचा सर्वात नावाजलेला विक्रम म्हणजे त्याने फेकलेला १६१.३ किमी/प्रतितासाचा तो चेंडू. २००३ मध्ये त्याने हा चेंडू टाकला होता. त्याआधी, क्रिकेटच्या मागील १०० वर्षाच्या इतिहासात असा चेंडू टाकणे कोणाला जमले नव्हते. पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबमधील रावळपिंडी येथे शोएब अख्तरचा जन्म झाला. १३ ऑगस्ट १९७५ ही त्याची जन्मतारीख. 

बालपणीचा संघर्ष - 

शोएबने क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली. रावळपिंडीच्या दुपारच्या रणरणत्या उन्हात तो मैदानावर आपल्या गोलंदाजीचा सराव करायचा. शोएबला उसाचा रस खूप आवडत असे. सराव करुन आल्यानंतर त्याला तो नेहमी तो प्यावासा वाटायचा पण त्याच्याकडे पैसे नसायचे. म्हणून तो दुकानदाराला 'मी मोठा झालो की, उसाच्या रसाचे नवीन यंत्र घेऊन देईन' असे सांगत असे. बऱ्याच विनंत्या केल्यानंतर, तो दुकानदार शोएबला फुकट रस द्यायचा. काळ निघून गेला आणि शोएब मोठा गोलंदाज झाल्यावर त्याने आपले वचन पूर्ण केले. 

जगात 'रावळपिंडी एक्सप्रेसचा' उदय -

शोएबच्या वयात पाकिस्तानमध्ये अनेक वेगवान गोलंदाज तयार झाले. पाकिस्तान संघामध्ये गोलंदाजांची निवडप्रक्रिया सुरु होती. तेव्हा शोएबला त्या निवडप्रक्रियेत भाग घ्यायचा होता. जेव्हा तो मैदानावर पोहोचला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला काय करावे ते कळत नव्हते. कारण त्या निवडीसाठी २००० गोलंदाज आपले नशीब आजमवायला आले होते. या निवडीसाठी आपला नंबरच येणार नाही असे त्याला वाटले. म्हणून त्याने निवड करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या मोठ्या मैदानावर जोरात धावण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या त्या तापलेल्या उन्हात हा कोण वेडा धावतोय हे पाहून निवड करणाऱ्यांनी त्याला बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी तुला काय पाहिजे असे विचारल्यावर शोएबने आपल्याला एक संधी पाहिजे असे बोलून दाखवले. शोएबने ती संधी हेरली आणि त्यानंतर तो जगात 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाऊ लागला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.