नवी दिल्ली - विराट कोहली हा आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिन्ही स्वरूपात विराटचा फॉर्म जबरदस्त असतो. २००८मध्ये पदार्पण करणारा कोहली क्रिकेट जगतात 'रेकॉर्ड किंग' म्हणूनही ओळखला जातो.
आजच्या दिवशी विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १० हजार धावा करण्याचा विक्रम रचला. २०१८मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळला गेला. विराटने शानदार फलंदाजी करत १५७ धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीदरम्यान विराटने १० धावा करून दहा हजार धावा करण्याचा विश्वविक्रम केला.
विराटने २०५ डावात ही कामगिरी केली होती. तर, सचिनने २५९ डावात हे स्थान मिळवले होते. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने २६३ आणि रिकी पाँटिंगने २६६ डावात हा विक्रम केला.
विराटची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी -
३१ वर्षीय विराट कोहलीने आतापर्यंत २८८ एकदिवसीय सामने खेळले असून त्याने ११, ८६७ धावा केल्या आहेत. या स्वरुपात विराटनेही ४३ शतके आणि ५८ अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय स्वरूपातील सर्वाधिक शतकांमध्ये सचिन तेंडुलकरनंतर विराट हा दुसरा खेळाडू आहे. सचिनने (४९) शतके झळकावली होती. तर, विराटच्या खात्यात ४३ शतके आहेत.