कराची - आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने फलंदाजांना घाबरवणारा गोलंदाज म्हणजे पाकिस्तानचा शोएब अख्तर. ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या अख्तरने १८ वर्षापूर्वी आजच्या दिवशी क्रिकेटमध्ये वेगवान चेंडू टाकला होता. २००२ मध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात अख्तरने हा कारनामा केला होता.
-
#OnThisDay in 2002, @shoaib100mph became the first bowler to break the 100 mph barrier when he was measured bowling at 100.04mph (161kph) during an ODI against New Zealand at GSL. pic.twitter.com/ju2PnTwUod
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#OnThisDay in 2002, @shoaib100mph became the first bowler to break the 100 mph barrier when he was measured bowling at 100.04mph (161kph) during an ODI against New Zealand at GSL. pic.twitter.com/ju2PnTwUod
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 27, 2020#OnThisDay in 2002, @shoaib100mph became the first bowler to break the 100 mph barrier when he was measured bowling at 100.04mph (161kph) during an ODI against New Zealand at GSL. pic.twitter.com/ju2PnTwUod
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 27, 2020
ताशी १६१.३ किमी टाकलेल्या या वेगवान चेंडूचा सामना न्यूझीलंडच्या क्रेग मॅकमिलनने केला होता. आजही शोएब अख्तरचा हा चेंडू जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू मानला जातो. लाहोरच्या मैदानावर त्यावेळी बॉलची गती नोंदवणाऱ्या उपकरणांनी आयसीसीच्या निकषांची पूर्तता केली नसल्याने अख्तरच्या या विक्रमाची नोंद ठेवण्यात आलेली नाही.
अख्तरच्या आधी वेगवान चेंडूचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जेफ थॉमसनच्या नावावर होता, त्याने १९७५मध्ये ९९.८ मैल वेगाने चेंडू टाकला होता. शोएब अख्तरच्या या पराक्रमानंतर तीन वेळा चेंडू १०० मैलाच्या जवळपास टाकण्यात आला. मात्र, अद्याप कोणत्याही गोलंदाजाने शोएबच्या १६१.३ किमी/तासाच्या विक्रमाला स्पर्श केला नाही.
अख्तरशिवाय २००५मध्ये ब्रेट ली आणि २०१०मध्ये शॉन टेटने ताशी १६१.१ किमी तसेच २०१५मध्ये मिचेल स्टार्कने १६०.४ ताशी किमी वेगाचा चेंडू टाकला होता.