चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीआधी इंग्लंड संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंग्लंडचा फलंदाज ओली पोप भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघात दाखल झाला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले की, पोप ऑगस्ट २०२० मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. यातून आता सावरला असून भारताविरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
२३ वर्षीय ओली पोप इंग्लंड संघाच्या सराव सत्रात भाग घेत आहे. त्याने आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याने ३७.९४ च्या सरासरीने ६४५ धावा केल्या आहेत.
![Ollie Pope added to England squad ahead of first Test against India](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10485316_500_10485316_1612356627512.png)
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील पहिले दोन सामने चेन्नईत तर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्वाची आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा विजय उल्लेखनीय; विल्यमसनकडून टीम इंडियाचे कौतूक
हेही वाचा - पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ लाहोरमध्ये दाखल