डुनेडिन (न्यूझीलंड) - न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशला ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. तेव्हा बांगलादेशचा संघ १३१ धावांवरच गारद झाला. न्यूझीलंडने हा सामना एकतर्फा जिंकला.
-
New Zealand win!
— ICC (@ICC) March 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Brilliant bowling from the @BLACKCAPS helps the hosts to an eight-wicket victory over @BCBtigers in Dunedin. #NZvBAN | https://t.co/fPmDmMSVvY pic.twitter.com/GtsMxzNkhu
">New Zealand win!
— ICC (@ICC) March 20, 2021
Brilliant bowling from the @BLACKCAPS helps the hosts to an eight-wicket victory over @BCBtigers in Dunedin. #NZvBAN | https://t.co/fPmDmMSVvY pic.twitter.com/GtsMxzNkhuNew Zealand win!
— ICC (@ICC) March 20, 2021
Brilliant bowling from the @BLACKCAPS helps the hosts to an eight-wicket victory over @BCBtigers in Dunedin. #NZvBAN | https://t.co/fPmDmMSVvY pic.twitter.com/GtsMxzNkhu
ट्रेंट बोल्टच्या माऱ्यासमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. पहिल्या दहा षटकात बांगलादेशची अवस्था २ बाद ३३ अशी होती. ठराविक अंतराने बांगलादेशचे विकेट्स पडल्या. यष्टीरक्षक फलंदाज रहीमने ४९ चेंडूत सर्वाधिक २३ धावा काढल्या. तर लिटन दासने ३६ चेंडूचा सामना करताना १९ धावा जमवल्या. सौम्या सरकारला भोपळाही फोडता आला नाही. बोल्टने २७ धावांत ४ गडी बाद केले. निशम आणि सँटनर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर हेन्रीने एक गडी टिपला.
बांगलादेशने दिलेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिलने १९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ३८ धावा केल्या. तर हेन्री निकोलस ४९ धावांवर नाबाद राहिला. डेन्रीने डेवोन कोंवे (२७) याच्यासोबत दुसऱ्या गड्यासाठी ६५ धावांची भागिदारी केली. बांग्लादेशकडून हसन आणि अहमद यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. उभय संघातील दुसरा सामना ख्राइस्टचर्च येथे २३ मार्चला खेळला जाईल.
हेही वाचा - Ind vs Eng ५th T२० : भारत-इंग्लंड यांच्यात आज निर्णायक मुकाबला
हेही वाचा - IND vs ENG : आनंदाची बातमी; टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाज भारतीय संघात परतला