वेलिंग्टन - भारतविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच न्यूझीलंडच्या एका खेळाडूने पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. टी-२० त भारताने तर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने निर्भेळ यश मिळवले. यामुळे कसोटी मालिकेला वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिले जात आहे. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे. दरम्यान मालिकेच्या पहिल्या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने माघार घेतली असून त्याच्या ऐवजी मॅट हेन्रीचा समावेश संघात करण्यात आला आहे.
नील वॅग्नर लवकरच बाप बनणार आहे. यामुळे त्याने पहिल्या कसोटीतून माघार घेत पत्नीसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. वॅग्नर पहिल्या कसोटीसाठी हॅमिल्टन येथे पोहोचला नाही. यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याला 'डच्चू' दिलं आहे. दुसरीकडे मॅट हेन्रीने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची कसोटी सामना खेळल्यानंतर संघात परतला आहे. त्याला त्या कसोटीत दुखापत झाली होती. या कारणाने तो भारताविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नव्हता.
-
Neil Wagner will not be joining the squad in Wellington ahead of the first Test as he and his wife Lana await the birth of their first child. Wagner will remain in Tauranga until the birth. Matt Henry joins the squad tonight as cover. #NZvIND
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Neil Wagner will not be joining the squad in Wellington ahead of the first Test as he and his wife Lana await the birth of their first child. Wagner will remain in Tauranga until the birth. Matt Henry joins the squad tonight as cover. #NZvIND
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2020Neil Wagner will not be joining the squad in Wellington ahead of the first Test as he and his wife Lana await the birth of their first child. Wagner will remain in Tauranga until the birth. Matt Henry joins the squad tonight as cover. #NZvIND
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2020
उभय संघात पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राइस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
- पहिली कसोटी : २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन
- दुसरी कसोटी : २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राईस्टचर्च
- (दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार पहाटे ४.०० वाजता सुरू होणार)
असा आहे भारताचा कसोटी संघ -
- विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा.
असा आहे न्यूझीलंडचा कसोटी संघ -
- केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रॅंडहोम, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर (दुसऱ्या सामन्यासाठी), बीजे वॉलटिंग, मॅट हेन्री.