कराची - पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज नासीर जमशेदला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी १७ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जमशेदने पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहकारी खेळाडूला लाच देण्याचे कृत्य केले होते. त्यामुळे त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर झाल्मी यांच्यातील सामन्यात, नासीर जमशेदने खेळाडूंना खराब कामगिरी करण्यास सांगितले. हे प्रकरण समोर येताच जमशेद याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. जमशेद या प्रकरणात दोषी आढळला. तेव्हा ही कारवाई करण्यात आली.
जमशेदसह या प्रकरणात ब्रिटीश नागरिक असलेल्या युसूफ अन्वर आणि मोहम्मद एजाज यांनाही अटक करण्यात आली होती. तिघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जमशेदला १७ महिन्यांचा, अन्वरला ४०, तर एजाजला ३० महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. दरम्यान, जमशेदने पाकिस्तानसाठी २ कसोटी, ४८ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले आहेत.
हेही वाचा - युवा विश्वचषक : जगज्जेतेपदासाठी भारताचा मुकाबला बांगलादेशशी
हेही वाचा - तिरंगी मालिका : भारताच्या विजयात स्मृती चमकली, ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा