नवी दिल्ली - भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने 'बांगलादेशच्या कर्णधारात धोनीची झलक दिसते', असे म्हटले आहे. बांगलादेशने महमुदुल्लाहच्या नेतृत्वात टी -२० मध्ये प्रथमच भारताला पराभूत केले आहे.

हेही वाचा - हिटमॅन मोठ्या विक्रमापासून 'दोन षटकार' दूर, असा विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय
'जेव्हा आपण जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध सामने जिंकतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. सामन्यादरम्यान झालेल्या काही बदलांसह महमुदुल्लाहने कर्णधारातील चांगले गुण दाखवले. त्याच्यात मला धोनीची झलक दिसते. पॉवर प्लेनंतर, त्याने पार्ट टाईम गोलंदाजांना संधी दिली. ही रणनीती धोनी नेहमी वापरत होता', असे इरफानने महमुदुल्लाहचे कौतुक करताना म्हटले.
बांगलादेशने टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. पण दुसर्या सामन्यात बांगलादेशचा आठ गड्यांनी पराभव करून भारताने दमदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे उद्या रविवारी नागपूर येथे होणारा तिसरा आणि अंतिम सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.