दुबई - भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीवीर मयांक अग्रवाल यांनी आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान गाठले आहे. या दोन्ही खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दमदार प्रदर्शन केले होते.
हेही वाचा - शेवटी 'तो' विक्रम मोडित निघाला !
गोलंदाजांच्या यादीत शमीने आठ स्थानांची झेप घेत सातवे स्थान गाठले आहे. शमीच्या खात्यात ७९० गुण आहेत. सर्वाधिक गुण मिळवणारा तो तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी कपिल देवने ८७७ आणि जसप्रीत बुमराह ८३२ गुण मिळवले आहेत.
-
Mohammed Shami breaks into top ten, attains career-best Test ranking
— ANI Digital (@ani_digital) November 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/1ssDaP46MN pic.twitter.com/WgzJz0h9Rf
">Mohammed Shami breaks into top ten, attains career-best Test ranking
— ANI Digital (@ani_digital) November 17, 2019
Read @ANI Story | https://t.co/1ssDaP46MN pic.twitter.com/WgzJz0h9RfMohammed Shami breaks into top ten, attains career-best Test ranking
— ANI Digital (@ani_digital) November 17, 2019
Read @ANI Story | https://t.co/1ssDaP46MN pic.twitter.com/WgzJz0h9Rf
फलंदाजांच्या यादीत मयांक ११ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत ८ कसोटी सामन्यांमध्ये ८५८ धावा केल्या असून त्याच्या खात्यात ६९१ गुण जमा झाले आहेत. रवींद्र जडेजाने चार स्थानांची झेप घेत ३५ वे स्थान मिळवले आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एका स्थानाची झेप घेत अनुक्रमे २० आणि २२ वे स्थान गाठले आहे.