ETV Bharat / sports

'स्टार' क्रिकेटपटूमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन! - मोईन अली कोरोना स्ट्रेन न्यूज

४ जानेवारीला मोईन अलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य सेवा उपसंचालक हेमंत हेराथ यांनी बुधवारी सांगितले. मार्चच्या मध्यापासून श्रीलंकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून ५०,२०० रुग्णांची नोंद झाली आहे.

Moeen ali gets corona positive with new strain
'स्टार' क्रिकेटपटूमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन!
author img

By

Published : Jan 15, 2021, 6:46 AM IST

कोलंबो - कोरोनाचा नवीन प्रकार म्हणजे 'स्ट्रेन'ची इंग्लंडच्या क्रिकेट संघात एन्ट्री झाली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीला या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले आहे. श्रीलंका क्रिकेट संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत वृत्त दिले. कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.

Moeen ali gets corona positive with new strain
मोईन अली

४ जानेवारीला मोईन अलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य सेवा उपसंचालक हेमंत हेराथ यांनी बुधवारी सांगितले. मार्चच्या मध्यापासून श्रीलंकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून ५०,२०० रुग्णांची नोंद झाली आहे. या महामारीमुळे देशात २७७ लोकांचा जीव गेला आहे.

४ ऑक्टोबरपासून आतापर्यंत सुमारे ४७,००० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबेनॉन आणि सिंगापूर या देशांसह ब्रिटनमध्ये नव्या कोरोना स्ट्रेनची प्रकरणे समोर आली आहेत.

हेही वाचा - भारत वि. ऑस्ट्रेलिया : टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.