सिडनी - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिसने बिग बॅश लीगमध्ये ताबडतोड खेळी करत इतिहास रचला. त्याने या लीगमध्ये सर्वाधिक धावांची खेळी साकारली. स्टॉयनिसने ७९ चेंडूत १४७ धावांची नाबाद खेळी केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्टॉयनिसने स्टार्स संघाकडून खेळताना ही खेळी केली. सिडनी सिक्सर्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मार्कस स्टॉयनिस आणि हिल्टन कार्टराइट या सलामीवीर जोडीने २०० धावांची सलामी दिली.
-
You've just gotta watch this highlights package of Marcus Stoinis' 147no @dream11 | #BBL09 pic.twitter.com/IZqEt2VZJE
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">You've just gotta watch this highlights package of Marcus Stoinis' 147no @dream11 | #BBL09 pic.twitter.com/IZqEt2VZJE
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2020You've just gotta watch this highlights package of Marcus Stoinis' 147no @dream11 | #BBL09 pic.twitter.com/IZqEt2VZJE
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2020
हिल्टनने ४० चेंडूत ५९ धावा केल्या. तर स्टॉयनिसने ७९ चेंडूत नाबाद १४७ धावा चोपल्या. यामध्ये १३ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश आहे. या खेळीनंतर स्टॉयनिस बिग बॅश लीगमध्ये सर्वोच्च खेळी करणारा फलंदाज ठरला. या आधी ७ व्या हंगामात डार्सी शॉर्ट याने १२२ धावांची नाबाद खेळी केली होती.
हेही वाचा - बुमराहला यंदाचा 'पॉली उम्रीगर' पुरस्कार, तर पूनम यादव ठरली सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
हेही वाचा - विश्व करंडकातील पराभवाबाबत धोनीचा मोठा खुलासा, म्हणाला मला या गोष्टीचा...