सिडनी- न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. फर्ग्यूसनच्या चाचणीचा अहवाल अजून आला नसला तरी खबरदारी म्हणून त्याला संघापासून वेगळं करण्यात आले आहे.
शुक्रवारी खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर त्याला घशात त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. या अगोदरही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रिचर्डसनचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यात कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रिचर्डसनची संघात पुर्नवापसी झाली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यावर नजर टाकली तर, पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ७१ धावांनी विजय मिळवला आहे. २५९ धावांच्या आवाहनाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ
धावातच गारद झाला. मार्श आणि कमिंस यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर एडम झम्पा आणि लॉकी फर्ग्यूसनही प्रत्येकी २ विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला...