नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लूसनर यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून क्लूसनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फिल सिमन्स यांच्यानंतर, क्लूसनर आता अफगाणिस्तानला मार्गदर्शन करतील.
-
Details 👇https://t.co/IeWWY7gzsq
— ICC (@ICC) September 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Details 👇https://t.co/IeWWY7gzsq
— ICC (@ICC) September 27, 2019Details 👇https://t.co/IeWWY7gzsq
— ICC (@ICC) September 27, 2019
हेही वाचा -'भारत सुरक्षित आहे' हे सांगण्यासाठी त्याने केला चक्क दीड हजार किमींचा प्रवास
इंग्लंडमधील विश्वकरंडक स्पर्धेनंतर सिमन्स यांचा कार्यकाळ संपला होता. नियुक्ती झाल्यानंतर क्लूसनर म्हणाले, 'जगातील प्रतिभाशाली संघासोबत काम करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मी यासाठी खुप उत्साही आहे. हा संघ न घाबरता खेळतो. मेहनतीच्या आधारावर आम्ही जगातल्या सर्वोत्तम संघांपैकी एक बनू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे.'
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे(एसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लुतफुल्लाह स्टानिकजाई म्हणाले, 'क्लूसनर हे खूप प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या अनुभवाचा संघाला खुप फायदा होईल.' याआधी झिम्बाब्वे आणि आफ्रिका संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून क्लूसनर यांनी काम केले आहे.