ETV Bharat / sports

"जुन्या सवयीमुळे विराट कोहली फ्लॉप"

लक्ष्मणने एका टीव्ही कार्यक्रमात कोहलीच्या फलंदाजीचे तांत्रिक विश्लेषण केले. 'कोहलीच्या अपयशामागचे महत्वाचे कारण त्याची जुनी सवय आहे. स्विंग होणारा चेंडू विराटला पेचात टाकतो. इंग्लंडमध्येही त्याला ही समस्या होती', असे लक्ष्मणने म्हटले आहे.

Kohli flopped in New Zealand due to old habits said vvs laxman
"जुन्या सवयीमुळे विराट कोहली फ्लॉप"
author img

By

Published : Mar 2, 2020, 10:56 AM IST

ख्राईस्टचर्च - न्यूझीलंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकाही भारतीय संघाने गमावली. विदेशी खेळपट्ट्यांवर भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मात्र, या सर्वांमध्ये संघाचा कर्णधार विराट कोहली केंद्रबिंदू ठरला. खराब फॉर्मशी झगडत असणाऱ्या विराटला कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या याच कामगिरीबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही.एस. लक्ष्मणने मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा - आयपीएलसाठी 'थाला' चेन्नईत दाखल, नवीन लुक ठरतोय सोशल मीडियावर 'किलर'

लक्ष्मणने एका टीव्ही कार्यक्रमात कोहलीच्या फलंदाजीचे तांत्रिक विश्लेषण केले. 'कोहलीच्या अपयशामागचे महत्वाचे कारण त्याची जुनी सवय आहे. स्विंग होणारा चेंडू विराटला पेचात टाकतो. इंग्लंडमध्येही त्याला ही समस्या होती. विराटच्या समस्येचे सर्वात मोठे कारण स्विंग गोलंदाजीविरूद्ध त्याच्या बॅटचा कोन आहे. बाकी काही अडचण नाही. एलबीडब्ल्यू किंवा इतर गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता नाही. वास्तविक, चेंडूवर त्याची बॅट एका विशिष्ट कोनातून येते. यामुळे, बॅट आणि पॅड्समध्ये अंतर आहे. या परिस्थितीत त्यांना समायोजित करण्यासाठी वेळ नसतो. या मालिकेच्या दोन्ही डावांमध्ये आणि विशेषतः दुसर्‍या कसोटी सामन्यातही अशीच समस्या दिसून आली', असे लक्ष्मणने म्हटले आहे.

कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतील ही तिसरी वेळ आहे जेव्हा त्याला ६९ दिवसांत (एकदिवसीय, कसोटी आणि टी-२०) तीनही प्रकारात एकही शतक करता आलेले नाही. या काळात कोहलीने तिन्ही स्वरूपात २२ डाव खेळले आहेत. गेल्या वर्षीच्या २२ डिसेंबरला त्याने बांगलादेशविरुद्ध १३६ धावा केल्या होत्या.

यापूर्वी २५ फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान सुमारे २१० दिवसांत आणि २४ फेब्रुवारी ते सप्टेंबर २०११ दरम्यान सुमारे १८० दिवसांत कोहलीला एक शतकही करता आलेले नव्हते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.