मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. चेन्नईमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला भारताचा स्टार खेळाडू दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो ही चेन्नईत दाखल होण्यासाठी निघाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी फलंदाज लोकेश राहुल तंदुरूस्त झाला असून तो चेन्नईत दाखल होण्यासाठी निघाला आहे. चेन्नईसाठी निघतानाचा फोटो राहुलने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.
-
Glad to have completed my rehab strong.
— K L Rahul (@klrahul11) February 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
No better feeling than being back fit and healthy 🧿
Always fun to get back with the boys, and an honour to represent 🇮🇳
Looking forward to the home series 🙌 pic.twitter.com/TsGc6HErPr
">Glad to have completed my rehab strong.
— K L Rahul (@klrahul11) February 2, 2021
No better feeling than being back fit and healthy 🧿
Always fun to get back with the boys, and an honour to represent 🇮🇳
Looking forward to the home series 🙌 pic.twitter.com/TsGc6HErPrGlad to have completed my rehab strong.
— K L Rahul (@klrahul11) February 2, 2021
No better feeling than being back fit and healthy 🧿
Always fun to get back with the boys, and an honour to represent 🇮🇳
Looking forward to the home series 🙌 pic.twitter.com/TsGc6HErPr
दरम्यान, के एल राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरच्या दोन कसोटीपूर्वी दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी आला. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.
राहुलने विमानात बसताना एक फोटो ट्विट केला आहे. त्यासोबत त्याने, मी पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहे, हे सांगताना आनंद होत आहे. यापेक्षा चांगली फिलींग असूच शकत नाही. घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठी उत्सुक आहे, असे म्हटलं आहे.
असा आहे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.
हेही वाचा - 'अनोखी' हॅट्ट्रिक नोदवणाऱ्या मर्व ह्युजेस यांना 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान
हेही वाचा - तब्बल १२ वर्षानंतर 'या' आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळायचंय आयपीएल!