ETV Bharat / sports

केकेआरचा पंजाबवर २८ धावांनी विजय, आंद्रे रसेल विजयाचा हिरो - वरुण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्ती आयपीएलाच पहिला सामना खेळत आहे. त्याने चाहत्यांना घोर निराशा केली.

आंद्रे रसेल
author img

By

Published : Mar 27, 2019, 7:45 PM IST

Updated : Mar 27, 2019, 11:48 PM IST

कोलकाता - ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर २८ धावांनी विजय मिळविला. आयपीएलमधील हा त्याचा सलग दुसरा विजय ठरला. केकेआरने दिलेल्या २१९ धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघास ४ बाद १९० धावा करता आल्या.

केकेआरने दिलेल्या डोंगरा एवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. के.एल. राहुल १ धावांवर परतला. त्यानंतर ख्रिस गेल २ षटकार आणि २ चौकार ठोकत २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर मयंक अगरवालने ६ चौकार आणि १ षटकारसह ५८ धावा झोडपून काढल्या.

डेव्हिड मिलरने झटपट ५९ धावांची खेळी केली, पण ती खेळी संघास विजय मिळवून देऊ शकली नाही. मनदीप सिंग ३३ धावांवर नाबाद राहिला. केकेआरकडून आंद्रे रसेलने भेदक गोलंदाजी करत ३ षटकात २१ धावा देत २ गडी बाद केले. पीयुष चावला आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नितीश राणा (६३) आणि रॉबिन उथप्पा (६७) आंद्रे रसेल (४८) यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर केकेआरने पंजाबपुढे २१९ आव्हान ठेवले. या सामन्यात केकेआरने २० षटकात ४ बाद २१८ धावा केल्या.

केकेआरच्या सलामी जोडीने ३४ धावांची सलामी दिली. त्यात ख्रिस लेनने १० तर सुनील नरेनने झटपट २४ धावा काढल्या. त्यानतंर रॉबिन उथप्पा आणि नीतिश राणाने पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. राणाने ३४ चेंडूत ६३ धावा कुटल्या. त्यात ७ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले.

शेवटच्या ४ षटकात आंद्रे रसेलने आक्रमक फटकेबाजी केली. आंद्रे रसेलने १७ चेंडूत ४८ धावा झोडपल्या. त्यात ५ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. पंजाबकडून शमी, वरुण चक्रवर्ती, व्हिजोईन, ट्राय यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Intro:Body:

IPL 2019 kkr vs kxip- 

इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत सुरू आहे. कोलकाताच्या ईडन गार्डंन्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दोन्ही संघानी त्याचे पहिले सामने जिंकले असून संघात बदल केला आहे. 

कोलकाता आणि पंजाब यांच्यात २३ सामने झाले असून त्यात १५ सामन्यात केकेआरने बाजी मारली आहे. ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या १० पैकी ७ सामन्यात केकेआरने विजय मिळविला आहे. 

Conclusion:
Last Updated : Mar 27, 2019, 11:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.