मुंबई - कोरोनामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामावर अनिश्चिततेचे सावट आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी असलेले खेळाडू एकमेकांना सोशल मीडियावर डिवचताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स संघाचे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन, बुमराहने जर चहलला गोलंदाजी केली तर ते षटक कसे जाईल? असा प्रश्न विचारत चहलची खिल्ली उडवली होती. यावर चहलने मुंबई इंडियन्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी लाईव्ह चॅटमध्ये, रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा खेळाडू युजवेंद्र चहल फलंदाजीला आल्यानंतर आपण त्याला बादच करायचे नाही आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण कसे असेल यावर चर्चा करत, चहलची खिल्ली उडवली होती. यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवरून, बुमराहने चहलला गोलंदाजी केली तर ते षटक कसे जाईल, असा प्रश्न विचारला होता.
-
Are you pumped-up to see Bumrah bowl to Chahal? 👊😋
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Predict what the over will be like 👇#OneFamily #CricketMeriJaan @yuzi_chahal @Jaspritbumrah93 pic.twitter.com/d1FLt7b4JH
">Are you pumped-up to see Bumrah bowl to Chahal? 👊😋
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2020
Predict what the over will be like 👇#OneFamily #CricketMeriJaan @yuzi_chahal @Jaspritbumrah93 pic.twitter.com/d1FLt7b4JHAre you pumped-up to see Bumrah bowl to Chahal? 👊😋
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2020
Predict what the over will be like 👇#OneFamily #CricketMeriJaan @yuzi_chahal @Jaspritbumrah93 pic.twitter.com/d1FLt7b4JH
मुंबई इंडियन्सच्या या प्रश्नावर चहलने उत्तर दिले आहे. तो म्हणाला, 'आधी अॅरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीला बाद करा आणि मग मला बॉलिंग करण्याची स्वप्न पाहा.'
-
Keep dreaming i am batting no.10 or 11 before me finch ABD sir and king kohli is there first get them out then we will talk about my batting#staysafe🙏🏻😂
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Keep dreaming i am batting no.10 or 11 before me finch ABD sir and king kohli is there first get them out then we will talk about my batting#staysafe🙏🏻😂
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) April 2, 2020Keep dreaming i am batting no.10 or 11 before me finch ABD sir and king kohli is there first get them out then we will talk about my batting#staysafe🙏🏻😂
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) April 2, 2020
दरम्यान, कोरोनामुळे २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पण सद्य परिस्थिती पाहता ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होईल, अशी शक्यता नाही. केंद्र सरकार १४ एप्रिलला लॉकडाऊन संदर्भात काय निर्णय घेईल, यावर आयपीएलचे भवितव्य आहे. तसेच बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा खेळवता येईल का यावर विचार करत आहे. त्यातच काही संघमालकांनी छोट्या स्वरुपात आयपीएल स्पर्धा खेळवण्याची तयारी दाखवली आहे.
स्मृतीने लग्नासाठी ठेवल्या दोन अटी; वाचा, लव मॅरेज करणारी की अरेंज्ड?
VIDEO: रोहितची लाडकी लेक करतेय, बुमराहच्या बॉलिंग अॅक्शनची कॉपी