नवी दिल्ली - न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भारताविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघाबाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटने (एनझेडसी) मंगळवारी दिली.
-
Tom Latham will now lead the side at Seddon Park and Eden Park #NZvIND https://t.co/IQUlt6jSPp
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tom Latham will now lead the side at Seddon Park and Eden Park #NZvIND https://t.co/IQUlt6jSPp
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 3, 2020Tom Latham will now lead the side at Seddon Park and Eden Park #NZvIND https://t.co/IQUlt6jSPp
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 3, 2020
हेही वाचा - जोकोविच अव्वलस्थानी...२१ वर्षीय सोफियाने मिळवले सातवे स्थान
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विल्यमसनच्या जागी मार्क चॅपमनला संघात स्थान देण्यात आले आहे. विल्यमसन त्याच्या डाव्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. ही दुखापत गंभीर नसल्याचे एक्स-रे स्कॅनवरून असे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या भारताविरुद्धच्या टी-२० दरम्यान विल्यमसनला दुखापत झाली होती. त्याच्या अनुपस्थितीत टिम साऊदीने न्यूझीलंडचे नेतृत्व केले होते.
'आठवडाभर तो तंदुरुस्तीचे प्रशिक्षण सत्र चालू ठेवेल आणि त्यानंतर, तो फलंदाजीस सुरुवात करेल', असे टीम फिजिओ विजय वल्लभ यांनी एका निवेदनात म्हटले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ फेब्रुवारीला बुधवारी पहिला एकदिवसीय सामन्यात सामना होईल.