ETV Bharat / sports

जेवढं खेळता येईल तेवढं खेळणार - जेम्स फॉकनर - James faulkner future plans news

फॉकनर म्हणाला, "मी अद्याप खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मी आता प्रशिक्षण घेत आहे. मी अजूनही संघाबरोबर जोडलो गेलो आहे. शिवाय, संघाशी गप्पाही मारत आहे. जेवढे खेळता येईल तेवढे खेळायचे आहे."

James faulkner talks about playing cricket in future
जेवढं खेळता येईल तेवढं खेळणार - जेम्स फॉल्कनर
author img

By

Published : Jun 3, 2020, 4:53 PM IST

सिडनी - केंद्रीय करार मिळाला नसला तरी तस्मानियाच्या संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेम्स फॉकनरने म्हटले आहे. 2015 च्या विश्वविजेत्या संघाचा भाग असलेल्या फॉल्कनरचा 2020-21 हंगामाच्या कराराच्या यादीमध्ये समावेश केलेला नाही.

फॉकनर म्हणाला, "मी अद्याप खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मी आता प्रशिक्षण घेत आहे. मी अजूनही संघाबरोबर जोडलो गेलो आहे. शिवाय, संघाशी गप्पाही मारत आहे. जेवढे खेळता येईल तेवढे खेळायचे आहे."

फॉकनर पुढे म्हणाला, "संपूर्ण हंगामात मी ग्रिफो आणि तस्मानियाचा कर्णधार मॅथ्यू वेड यांच्याशी संवाद साधत असतो. मी करार केलेल्या खेळाडूंपैकी नाही परंतु तरीही खेळू शकतो. यामुळे त्यांना दुसर्‍या एखाद्याशी करार करण्याची संधी मिळेल आणि संघ आणखी मजबूत होईल."

अष्टपैलू फॉकनरने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी एक कसोटी सामना खेळला आहे. त्याने 69 एकदिवसीय सामन्यात 1032 तर, 24 टी-20 सामन्यात 159 धावा केल्या आहेत. फॉकनर नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 96 तर, टी-20 मध्ये 36 बळी जमा आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.