ETV Bharat / sports

अँडरसनने सर्वाधिक वेळा भारतीय फलंदाजांना केलं शून्यावर बाद, पाहा रेकॉर्ड

author img

By

Published : Feb 11, 2021, 3:29 PM IST

जेम्स अँडरसनने आपले प्रमुख अस्त्र रिव्हर्सं स्विंगवर शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणे या दोघांना त्रिफाळाचित केले. अजिंक्य रहाणे तर शून्यावर आल्या पावले माघारी परतला. विशेष म्हणजे, अँडरसनने त्याच्या करियरमध्ये सर्वाधिक वेळा भारतीय फलंदाजांना डक म्हणजे शून्यावर बाद केले आहे.

james anderson dismissed 29 indian batsman on duck in his cricket career
अँडरसनने त्याच्या कारकिर्दीत भारताच्या फलंदाजांना सर्वाधिक वेळा शून्यावर केलं बाद, पाहा रेकॉर्ड

मुंबई - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीची धार वयानुसार अधिक धारधार होताना दिसत आहे. ३८ वर्षीय अँडरसनने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ५ गडी बाद करत संघाच्या विजयात हातभार लावला. त्याने दुसऱ्या डावात, आपले प्रमुख अस्त्र रिव्हर्सं स्विंगवर शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणे या दोघांना त्रिफाळाचित केले. अजिंक्य रहाणे तर शून्यावर आल्या पावले माघारी परतला. विशेष म्हणजे, अँडरसनने त्याच्या करियरमध्ये सर्वाधिक वेळा भारतीय फलंदाजांना डक म्हणजे शून्यावर बाद केले आहे.

अँडरसनने आतापर्यंत १५८ कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याच्या नावे ६११ विकेट आहेत. एकदिवसीयमध्ये त्याने २६९ तर टी-२० त त्याच्या नावे १८ विकेट आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून अँडरसनने जवळपास ९०० विकेट घेतली आहेत. यात त्याने आत्तापर्यंत १४७ खेळाडूंना शून्यावर बाद केले आहे.

जेम्स अँडरसनने त्याच्या कारकिर्दीत २९ भारतीय फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे. तर या यादीत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. अँडरसनने पाकिस्तानच्या २५ खेळाडूंना शून्यावर माघारी धाडलं आहे. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी २१-२१ खेळाडूंना शून्यावर बाद करण्याची किमया केली आहे. ऑस्ट्रेलियाचे १६ खेळाडू अँडरसनच्या गोलंदाजीवर भोपळाही फोडू शकलेले नाहीत.

कोणत्या देशाचे, किती खेळाडूंना अँडरसनने शून्यावर केलं बाद...

  • भारत - २९
  • पाकिस्तान - २५
  • दक्षिण आफ्रिका - २१
  • वेस्ट इंडीज - २१
  • ऑस्ट्रेलिया - १६
  • न्यूझीलंड - १३
  • श्रीलंका - १३
  • झिम्बाब्वे - ३
  • बांग्लादेश - २
  • आयरलंड - २
  • नेदरलँड - १
  • स्कॉटलंड - १

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.