नवी दिल्ली - यंदाच्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे चार सामने जयपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने शनिवारी या संदर्भात माहिती दिली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्ले ऑफ दरम्यान जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा - VIDEO : न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने घेतलेला जबरदस्त झेल पाहिलात का?
'२०२० चे लक्ष्य वेगळे नाही आणि या आवृत्तीत चौथा संघ स्पर्धेत जोडला जाईल. २०१८ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेला खूप यश मिळाले', असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेला २०१८ मध्ये सुरूवात झाली होती. परंतू, यावर्षी एकच सामना खेळवला गेला होता. २०१९ मध्ये ही स्पर्धा तीन संघांमध्ये झाली होती. वेलोसिटी, ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवास हे संघ २०१९ मध्ये खेळले होते.
आयपीएलच्या आगामी हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होत आहे. या हंगामाचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार असून १७ मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.