ETV Bharat / sports

इरफान पठाणचा भारतीय गोलंदाजांना सावधानतेचा इशारा

इरफान म्हणाला, ''आयपीएलच्या संघांसह सर्व संघांना गोलंदाजांविषयी जास्त काळजी घ्यावी लागेल कारण दोन महिन्यांनंतर ते मैदानात परतल्यावर दुखापतीची शक्यता जास्त असेल. दुखापतींचे व्यवस्थापन करणे सर्वात महत्वाचे आहे. आपल्याला गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करावे लागेल."

irfan pathan on injury management of bowlers after corona break
इरफान पठाणचा भारतीय गोलंदाजांना सावधानतेचा इशारा
author img

By

Published : Jun 3, 2020, 4:27 PM IST

मुंबई - कोरोनानंतर क्रिकेट सुरू झाल्यानंतर, गोलंदाजांना दुखापतीबाबतच्या व्यवस्थापनाबाबत सावधगिरी बाळगावी लागेल, असे माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने म्हटले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लाकडाऊन सुरू आहे. तीन महिन्यानंतर काही क्रीडाविषयक उपक्रम अटींवर सुरू करण्यात आले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने गेल्या महिन्यात बोईसर येथे सराव सुरू केला होता.

इरफान म्हणाला, ''आयपीएलच्या संघांसह सर्व संघांना गोलंदाजांविषयी जास्त काळजी घ्यावी लागेल कारण दोन महिन्यांनंतर ते मैदानात परतल्यावर दुखापतीची शक्यता जास्त असेल. दुखापतींचे व्यवस्थापन करणे सर्वात महत्वाचे आहे. आपल्याला गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करावे लागेल."

आयसीसीनेही अलीकडेच गोलंदाजांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. इरफान 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 1105 धावा आणि 100 विकेट्स, एकदिवसीय मध्ये 1544 धावा आणि 173 विकेट्स आणि टी-20 मध्ये 172 धावा आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत.

29 जानेवारी 2006 म्हणजे 14 वर्षांपूर्वी, इरफाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेतली होती. पाकिस्तानची वरची फळी उद्ध्वस्त करत इरफानने सलमान बट्ट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले होते. त्याच्या या प्रतापामुळे त्याने आपले नाव सर्वदूर पोहोचवले. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा भारतीय ठरला होता. त्याच्या व्यतिरिक्त हरभजन सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.