ETV Bharat / sports

SRH vs RR : राहुल तेवातिया आणि खलील अहमद यांच्यात भांडण, पाहा व्हिडीओ

author img

By

Published : Oct 12, 2020, 7:03 AM IST

तेवतिया-पराग जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांवर 'हल्ला बोल' करत अशक्यप्राय वाटणारा विजय राजस्थानला मिळवून दिला. दरम्यान, या सामन्यात तेवतिया आणि हैदराबादचा गोलंदाज खलील अहमद यांच्यात बाचाबाची झाली.

IPL 2020: WATCH Rahul Tewatia and Khaleel Ahmed get involved in a heated argument before umpires intervene
SRH vs RR : राहुल तेवातिया आणि खलील अहमद यांच्यात भांडण, पाहा व्हिडीओ

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात रविवारी डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर विजयासाठी १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल राजस्थानच्या राहुल तेवतिया आणि रियान पराग जोडीने सहाव्या गड्यासाठी नाबाद ८५ धावांची भागिदारी करत सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. तेवतिया-पराग जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांवर 'हल्ला बोल' करत अशक्यप्राय वाटणारा विजय राजस्थानला मिळवून दिला. दरम्यान, या सामन्यात तेवतिया आणि हैदराबादचा गोलंदाज खलील अहमद यांच्यात बाचाबाची झाली.

घडले असे की, खलील अहमद अखेरचे षटक टाकत होता. यावेळी खलील आणि तेवतिया यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. तेवतियाने खलील अहमदला शेवटच्या षटकात डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, खलील अहमदने त्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करत गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले. मात्र, विजयानंतर तेवतियाचा पारा अधिक चढला. खलील आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मध्यस्थी करत हा वाद शांत केला.

दरम्यान, तेवतिया आणि खलील यांची बाचाबाची कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. राजस्थानच्या विजयानंतर तेवतियाचा संताप व्यक्त करताना पाहायला मिळाला. या घटनेनंतर तेवतिया सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावांपर्यंत मजल मारली होती. मनिष पांडेचे अर्धशतक (५४) आणि वॉर्नरची ४८ धावांची खेळी याच्या बळावर हैदराबादने सन्माजनक धावसंख्या उभारली.

हैदराबादच्या १५८ धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानची अवस्था एकवेळ १२ षटकांत ५ बाद ७८ अशी झाली होती. तेव्हा राहुल तेवतिया आणि रियान पराग या जोडीने सुरुवातीला सावध फलंदाजी केली. अखेरच्या काही षटकांत दोघांनीही दमदार फलंदाजी करत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. तेवतिया ४५ तर पराग ४२ धावांवर नाबाद राहिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.