ETV Bharat / sports

IPL २०२० Points Table : हैदराबादची सातव्या स्थानावरून मोठी झेप, इतरांची धाकधुक वाढवली

author img

By

Published : Nov 1, 2020, 1:32 PM IST

हैदराबादने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने दोन गुणांची कमाई करत तसेच स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवत, गुणतालिकेत मोठी झेप घेतली. हैदराबाद विरुद्ध बंगळुरू सामन्यानंतर गुणतालिकेत काय बदल झाले पाहा...

IPL 2020 Points Table: SunRisers Hyderabad Take A Massive Leap After Beating RCB By Five Wickets
IPL २०२० Points Table : हैदराबादची सातव्या स्थानावरून मोठी झेप, पाहा काय झाले बदल...

शारजाह - सनरायझर्स हैदराबादने शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा धक्का दिला. त्यांनी बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने दोन गुणांची कमाई करत तसेच स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवत, गुणतालिकेत मोठी झेप घेतली. हैदराबाद विरुद्ध बंगळुरू सामन्यानंतर गुणतालिकेत काय बदल झाले पाहा...

सनरायझर्सची भरारी...

बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी हैदराबाद गुणतालिकेत सातव्या क्रमाकांवर होता. कारण हैदराबादने १२ सामने खेळले होते. या १२ सामन्यांमध्ये त्यांना पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता, तर सात सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ते १० गुणांसह सातव्या स्थानावर होते. पण १३व्या सामन्यात हैदराबादच्या संघाने विजय मिळवत दोन गुणांची कमाई केली. यासह हैदराबादने गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर मोठी झेप घेतली.

...तर बंगळुरू प्ले ऑफसाठी ठरेल पात्र

हैदराबादच्या सामन्यापूर्वी बंगळुरूचा संघ १२ सामने खेळला होता. या १२ सामन्यांमध्ये बंगळुरूने सात विजय मिळवले होते, तर त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. १३व्या सामन्यात बंगळुरूला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे बंगळुरुचे १४ गुण असून ते दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. बंगळुरुचा अजून एक सामना शिल्लक आहे. हा सामना जिंकून १६ गुणासह प्ले-ऑफसाठी ते पात्र ठरू शकतात.

अशी आहे गुणतालिकेची स्थिती -

सद्यघडीला गुणतालिकेत मुंबईचा संघ १८ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. दुसऱ्या स्थानावर बंगळुरु आहे. तर तिसऱ्या स्थानी दिल्लीचा संघ आहे. चौथ्या स्थानावर हैदराबादच्या संघाने कब्जा केला आहे. पंजाबचा संघ चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरला आहे. सहाव्या आणि सातव्या स्थानावर अनुक्रमे राजस्थान आणि कोलकाताचा संघ आहे. तर धोनीचा चेन्नई संघ तळाशी म्हणजे, आठव्या स्थानावर आहे.

हेही वाचा - SRH vs RCB : हैदराबादचा बंगळुरूला 'पंच', पाच गडी राखून नोंदवला विजय

हेही वाचा - DC vs MI : मुंबईचा नाद नाय करायचा.. दिल्लीवर ९ गडी राखून विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.