ETV Bharat / sports

क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी...यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द!

author img

By

Published : Mar 30, 2020, 7:43 PM IST

माध्यमांच्या वृत्तानुसार, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील वर्षी मेगा ऑक्शन म्हणजे खेळाडूंचा लिलाव होणार नाही.

ipl 2020 cancelled by reports
क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी...यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द!

मुंबई - सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेवर पाणी फेरले गेले आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे यंदाच्या आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा फटका जगातील साडे सात लाख लोकांना झाला असून ३३ हजार लोकांचा या व्हायरसने जीव घेतला आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील वर्षी मेगा ऑक्शन म्हणजे खेळाडूंचा लिलाव होणार नाही. यावर्षी आयपीएल होणार नाही. ही स्पर्धा पुढच्या वर्षी असेल. आम्हाला देशातील परिस्थिती माहित आहे आणि आम्हाला कोणताही धोका घ्यायचा नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी माध्यमांना सांगितले.

देशात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.