ETV Bharat / sports

IPL : सीएसके टीममधील 12 सदस्यांना कोरोनाची लागण; संपूर्ण टीम क्वारंटाइन - COVID-19

यूएईमध्ये टुर्नांमेंटसाठी दाखल झालेल्या सर्वांना चाचणी करणे बंधनकारक आहे. यानुसार क्वारंटाइन कालावधीत टीमच्या हॉटेलमध्ये पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी चाचणीची व्यवस्था करण्यात आली होती. या चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडुंची ट्रेनिंग सुरू होणार अशी नियमावली होती.

IPL: 12 CSK squad members test positive, team in quarantine again

author img

By

Published : Aug 28, 2020, 7:27 PM IST

दुबई - चेन्नई सुपर किंग्ज टीममधील तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाचवेळी इतक्या लोकांना लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आयपीएल-२०२० ला केवळ २२ दिवस बाकी असतानाच ही घटना समोर आल्याने क्रिकेट वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयपीएलला गेलेल्या टीमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण टीमला क्वारंटाइन करण्यात आले आहे. चेन्नईमधील एका कॅम्पदरम्यान या सर्वांना लागण झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती आहे. २१ ऑगस्ट रोजी चेन्नई सुपर किंग्ज टीम दुबईला दाखल झाली होती. यानंतर त्यांनी ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला. २८ ऑगस्टपासून प्रशिक्षणाला सुरुवात होणार होती. या घटनेमुळे सर्व खेळाडुंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची सुरुवात १ सप्टेंबारपासून होणार असल्याची माहिती आहे. दुबईला दाखल झालेल्या इतर टीमच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज अद्यापही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहे.

यूएईमध्ये टुर्नांमेंटसाठी दाखल झालेल्या सर्वांना चाचणी करणे बंधनकारक आहे. यानुसार क्वारंटाइन कालावधीत टीमच्या हॉटेलमध्ये पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी चाचणीची व्यवस्था करण्यात आली होती. या चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडुंची ट्रेनिंग सुरू होणार अशी नियमावली होती.

यूएईमध्ये जाण्यापूर्वी सीएसकेने चेन्नई येथे पाच दिवसांचे प्रशिक्षण ठेवले होते. यामध्ये एम.एस.धोनी, सुरेश रैना, दीपक चहर, अंबाती रायडू, पीयूष चावला आणि शार्दुल ठाकूर यांनी सहभाग घेतला होता.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.