ETV Bharat / sports

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याची घोषणा; तब्बल ७ वर्षांनी खेळणार कसोटी सामना - भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा २०२१

एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा इंग्लंड दौरा १६ जूनपासून सुरू होणार आहे.

indian-womens-team-will-play-series-in-all-formats-against-england
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याची घोषणा; तब्बल ७ वर्षांनी खेळणार कसोटी सामना
author img

By

Published : Apr 13, 2021, 6:30 PM IST

मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघातील या दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा हा दौरा १६ जूनपासून सुरू होणार आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या वर्षाच्या सुरूवातीला भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे, असे ट्विट करून सांगितलं होतं. २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघाने २०१४ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या नंतर अद्याप भारतीय महिला संघाने कसोटी सामना खेळलेला नाही.

इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या दौऱ्याबाबत सांगितलं की, 'आम्ही भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेबाबत उत्साहित आहोत.'

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना १६ ते १९ जून या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर २७ जूनला पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे ३० जून आणि ३ जुलै रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेनंतर उभय संघातील टी-२० मालिका १५ जुलैपासून खेळली जाणार आहे.

हेही वाचा - IPL २०२१: कोलकात्यासमोर मुंबईचं तगडं आव्हान; मागील १२ सामन्यात फक्त १ विजय, जाणून घ्या आकडेवारी

हेही वाचा - RR vs PBKS : ...माझ्याकडे शब्द नाहीत; पराभवानंतर संजूची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.