मुंबई - फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत, स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आलेली, भारतीय सलामीवीर शेफाली वर्माने, खराब चेंडू वाटला की तो चेंडू टोलावणारचं, असा निर्धार बोलून दाखवला आहे. शेफालीची आक्रमक फलंदाजी पाहून त्याला 'लेडी सेहवाग' या असे म्हटलं जात आहे.
१६ वर्षीय शेफाली म्हणाली की, 'मला टीम इंडियाला जगातील सर्व संघांना पराभूत करणारा संघ झालेला पाहायला आवडेल. आम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करु इच्छितो. भलेही, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला. तो दिवस आमचा नव्हता, यामुळे आम्ही पराभूत झालो. पण खेळामध्ये हार-जीत होतच असते. पराभव आम्ही बदलू शकत नाही. पण आम्ही चांगली तयारी करुन पुढील आव्हानासाठी सज्ज राहू.
मला जर चेंडू खराब चेंडू वाटला तर तो चेंडू मी स्टेडियममध्ये टोलवण्यास पुढे-मागे बघणार नाही, असेही शेफाली म्हणाली. दरम्यान, शेफाली भारताच्या एकदिवसीय संघात असावी, अशी इच्छा एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केली आहे. यासोबत अनुभवी मितालीने, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटचा फॉरमॅट वेगळा असल्याचे सांगताना, शेफालीला संयम राखायला शिकले पाहिजे, असे सांगितले आहे.
शेफालीने आजघडीपर्यंत १९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. या १९ सामन्यात ती फक्त एकदाच नाबाद राहिली आहे. तिने १४६.२ च्या स्ट्राईटरेटने ४८७ धावा केल्या आहेत. यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा - स्मिथ, वॉर्नर नसल्याने जिंकलात, पाक प्रशिक्षकांनी टीम इंडियाला डिवचले
हेही वाचा - टी-२० विश्वकरंडक नियोजित वेळेत होणार, यजमान ऑस्ट्रेलियाचा विश्वास