ETV Bharat / sports

IND vs AUS: अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्येच होणार - ind vs aus 4th test in brisbane news

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे.

indian team will go to brisbane for final test against australia
IND vs AUS: अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्येच होणार
author img

By

Published : Jan 11, 2021, 8:42 AM IST

मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, क्वींसलँड राज्याने, लॉकडाऊनची नियमावली कडक केली होती. यामुळे हा सामना ब्रिस्बेनमध्ये होणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती.

  • Acting on the advice of Queensland Health and the Queensland Government, we are working together with Stadiums Queensland to ensure the safety of patrons attending the fourth Vodafone Test, with a crowd capacity of 50% at the Gabba.

    Full release: https://t.co/3n0gb2f7oh pic.twitter.com/vEuCB8fJRH

    — Cricket Australia (@CricketAus) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

क्वींसलँड राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे तेथील सरकारने सिडनीहून किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाइनच्या नियमाचे पालन करावे लागेल, असे जाहीर केले होते. हा क्वारंटाइन १४ दिवसांचा होता. तसेच ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेनचे रुग्ण देखील आढळले होते. यामुळे हा परिसरात तीन दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. या सर्व कारणामुळे उभय संघातील सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय संघाने काही बाबींची लिखीत हमी मागितली आहे. ती मिळाल्याने भारतीय संघ आता संतुष्ट आहे. यामुळे उभय संघातील चौथा सामना नियोजित वेळेत १५ तारखेपासून ब्रिस्बेनमध्येच होणार आहे.

हेही वाचा - IND vs AUS : ऋषभ पंतचे नाबाद अर्धशतक, सामना रोमांचक स्थितीत

हेही वाचा - पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे ऑस्ट्रेलियन कर्णधाराला भोवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.