ETV Bharat / sports

टीम इंडियासाठी नागपूरचे मैदान धोकादायक, विजयासाठी 'या' बाबी ठरणार महत्वपूर्ण

नागपुरचे मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. कारण या मैदानावर भारतीय संघाने ती सामने खेळलेली आहेत. यातील २ सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर राहिलेला एक सामना भारताने जिंकला आहे. दरम्यान, या मैदानावर तब्बल २१ महिन्यानंतर भारताचा सामना होत आहे.

author img

By

Published : Nov 10, 2019, 9:30 AM IST

नागपूर - भारत-बांगलादेश संघातील ३ सामन्यांची टी-२० मालिका सद्यस्थितीत १-१ ने बरोबरीत आहे. या मालिकेतील अखेरचा तिसरा सामना आज (रविवार) नागपुरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघ या सामन्यात जरी भक्कम वाटत असला तरी बांगलादेशचा संघ नेहमीच धोकादायक ठरलेला आहे. मात्र, भारतीय संघाला विजयाची संधी जास्त आहे. पण विदर्भाच्या या मैदानावर विजयासाठी खेळपट्टी तसेच नाणेफेक महत्वाची ठरणार आहे.

नागपुरचे मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. कारण या मैदानावर भारतीय संघाने ती सामने खेळलेली आहेत. यातील २ सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर राहिलेला एक सामना भारताने जिंकला आहे. दरम्यान, या मैदानावर तब्बल २१ महिन्यानंतर भारताचा सामना होत आहे.

डिसेंबर २००९ मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेच्या विरोधात पहिला सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघ २९ धावांनी पराभूत झाला. त्यानंतर १५ मार्च २०१६ ला न्यूझीलंडच्या विरोधात झालेल्या सामन्यात भारताचा ४७ धावांनी पराभव झाला होता. २९ जानेवारी २०१७ ला तिसरा सामना इंग्लंड विरुध्द झाला. हा सामना भारतीय संघाने अवघ्या ५ धावांनी जिंकला. दरम्यान, बांगलादेशचा संघ पहिल्यादांच या मैदानावर खेळणार आहे.

दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली असून त्याने या सामन्यात ८५ धावांची दणकेबाज खेळी केली होती. त्याचा हा फॉर्म शेवटच्या सामन्यात कायम राहिला तर बांगलादेश समोरील अडचणीत वाढ होऊ शकते.

हेही वाचा - ज्या संघाचे खेळाडू आपले कौशल्य सिद्ध करतील तोच संघ चॅम्पियन - रोहित शर्मा

हेही वाचा - टीम इंडिया नागपुरात 'फायनल' निकालासाठी सज्ज

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.