ETV Bharat / sports

#HBDRahulDravid : पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू! - राहुल द्रविड ४७ बर्थडे न्यूज

सरळ-साधे व्यक्तिमत्व, तंत्रशुद्ध शैलीचा बादशहा, मेहनती, जॅंमी, जेंटलमॅन,  उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. एमबीएचे शिक्षण सुरू असताना द्रविडने कसोटी कारकिर्दीची सुरूवात केली.

indian former cricketer rahul dravid turns 47 today
#HBDRahulDravid : पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू!
author img

By

Published : Jan 11, 2020, 10:56 AM IST

Updated : Jan 11, 2020, 12:17 PM IST

मुंबई - 'कसोटी क्रिकेट' हे क्रिकेटचे प्राथमिक अंग म्हणून ओळखले जाते. सध्या आयसीसीच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या प्रस्तावाला सर्वच बाजूंनी विरोध होत आहे. मर्यादित षटकांच्या वेळापत्रकासाठी या 'कंटाळवाण्या' क्रिकेट प्रकाराला एका बाजूला लोटणे हे कोणत्याही कसोटीपटूला नक्कीच पाहवणार नाही. जुने, अनुभवी आणि कसोटी 'स्पेशालिस्ट' असणाऱ्या क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या या 'आत्म्या'ला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच एक नाव म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड. 'द वॉल' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने आज वयाची ४७ वर्षे पूर्ण केली.

  • 👉 Scored over 10,000 runs in both Tests and ODIs
    👉 Faced more Test deliveries than any other batsman
    👉 Only player to be involved in two 300-plus ODI partnerships
    👉 48 international centuries

    Happy birthday, Rahul Dravid 🎂

    🗯️ What are your favourite memories of 'The Wall'? pic.twitter.com/m3tvtNA3g6

    — ICC (@ICC) January 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - महाराष्ट्राचा 'वीर' यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप खेळणार!

सरळ-साधे व्यक्तिमत्व, तंत्रशुद्ध शैलीचा बादशहा, मेहनती, जॅंमी, जेंटलमॅन, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. एमबीएचे शिक्षण सुरू असताना द्रविडने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर १९९६ मध्ये त्याने आपला पहिला सामना खेळला होता. दुखापतग्रस्त संजय मांजरेकरच्या जागी द्रविडला मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात त्याने ९५ धावांची जबरदस्त खेळी साकारली होती.

  • The 13,288 runs don't tell you the real story, nor the 36 test hundreds.
    31,258 balls and 44,152 bruising grinding minutes at the crease, nobody has spent as much time or played as many balls in the history of tests
    Rahul Dravid, for Adelaide & Kolkata and so many more.
    47 today. pic.twitter.com/eE1ouGsTba

    — Joy Bhattacharjya (@joybhattacharj) January 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू -

कसोटी त्यानंतर एकदिवसीय क्रिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडला टी-२० संघात पाहणे अनेक लोकांना 'जड' गेले. कसोटीत नांगर टाकून बसणाऱ्या द्रविडला टी-२० मध्ये मात्र मोठे यश मिळवता आले नाही. २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेला टी-२० सामना द्रविडचा पहिला आणि शेवटचा सामना ठरला. या सामन्यात त्याने ३ षटकारांसह ३१ धावा केल्या. 'टी-२० पदार्पणात संथ, सावध सुरुवात करणाऱ्या द्रविडची टी-२० कारकिर्द कव्हरमध्ये कॅच देऊन संपुष्टात आली', असे त्यावेळी समालोचनात म्हटले गेले. या सामन्यात इंग्लंडने सहा गडी राखून बाजी मारल्यामुळे त्याला टी-२० क्रिकेटमधून विजयी निरोप देण्याचे भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले नाही.

द्रविड स्पेशल -

  • द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये ३१२५८ चेंडू खेळले आहेत जो की एक विक्रम आहे. आजवर कोणताही फलंदाज ३०००० चेंडू खेळू शकलेला नाही.
  • राहुल द्रविड कसोटी क्रिकेट खेळणार्‍या सर्व १० संघांविरुद्ध शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज आहे.
  • कसोटीत सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रमही द्रविडच्या नावावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २१० झेल घेतले आहेत.

क्रिकेटची कारकिर्द -

राहुल द्रविडने भारताकडून १६४ कसोटी सामन्यात १३२८८ धावा केल्या असून त्यात ३६ शतके आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात भारतासाठी ३४४ सामने खेळले असून १२ शतके आणि ८३ अर्धशतकांच्या मदतीने १०८८९ धावा केल्या आहेत.

मार्गदर्शनाच्या भूमिकेत -

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही द्रविड भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांचा समावेश असलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाने २०१८ च्या आयसीसी विश्वकरंडक विजेतेपदाला गवसणी घातली. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून मिळालेल्या यशानंतर राहुल द्रविडची नॅशनल क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. या पदावरही द्रविड आपली कामगिरी चोख पार पाडत आहे.

Intro:Body:

#HBDRahulDravid : पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू!

मुंबई - 'कसोटी क्रिकेट' हे क्रिकेटचे प्राथमिक अंग म्हणून ओळखले जाते. सध्या आयसीसीच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या प्रस्तावाला सर्वच बाजूंनी विरोध होत आहे. मर्यादित षटकांच्या वेळापत्रकासाठी या 'कंटाळवाण्या' क्रिकेटप्रकाराला एका बाजूला लोटणे हे कोणत्याही कसोटीपटूला नक्कीच पाहावणार नाही. जुने, अनुभवी आणि कसोटी 'स्पेशालिस्ट' असणाऱ्या क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या या 'आत्म्या'ला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच एक नाव म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड. 'द वॉल' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने आज वयाची ४७ वर्षे  पूर्ण केली.

हेही वाचा -

सरळ-साधे व्यक्तिमत्व, तंत्रशुद्ध शैलीचा बादशहा, मेहनती, जॅंमी, जेंटलमॅन,  उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. एमबीएचे शिक्षण सुरू असताना द्रविडने कसोटी कारकिर्दीची सुरूवात केली. क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर १९९६ मध्ये त्याने आपला पहिला सामना खेळला होता. दुखापतग्रस्त संजय मांजरेकरच्या जागी द्रविडला मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात त्याने ९५ धावांची जबरदस्त खेळी साकारली होती.

द्रविड स्पेशल -

द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये ३१२५८ चेंडू खेळले आहेत जो की एक विक्रम आहे. आजवर कोणताही फलंदाज ३०००० चेंडू खेळू शकलेला नाही.

राहुल द्रविड कसोटी क्रिकेट खेळणार्‍या सर्व १० संघांविरुद्ध शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज आहे.

कसोटीत सर्वाधिक झेल पकडण्याचा  विक्रमही द्रविडच्या नावावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २१० झेल घेतले आहेत.

द्रविड जगातील एकमेव खेळाडू आहे जो पदार्पणाच्या सामन्यातूनच निवृत्त झाला. द्रविडने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात पदार्पण केले आणि याच सामन्यातून त्याने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली.

क्रिकेटची कारकिर्द -

राहुल द्रविडने भारताकडून १६४ कसोटी सामन्यात १३२८८ धावा केल्या असून त्यात ३६ शतके आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात भारतासाठी ३४४ सामने खेळले असून १२ शतके आणि ८३ अर्धशतकांच्या मदतीने १०८८९ धावा केल्या आहेत.

मार्गदर्शनाच्या भूमिकेत -

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही द्रविड भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देत आहे. त्याच्या  मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांचा समावेश असलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाने २०१८ च्या आयसीसी विश्वकरंडक विजेतेपदाला गवसणी घातली. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून मिळालेल्या यशानंतर राहुल द्रविडची नॅशनल क्रिकेट अकादमीचा  (एनसीए) प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. या पदावरही द्रविड आपली कामगिरी चोख पार पाडत आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 11, 2020, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.