ETV Bharat / sports

बीसीसीआयचा भोंगळ कारभार..! पैसे न दिल्याने, भारतीय संघ अडकला परदेशात - पैसे न दिल्याने, भारतीय संघ अडकला परदेशात

भारतीय संघ विदेश दौऱ्यावर जात असताना बीसीसीआयच्या वतीने खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापनाला तेथील खर्चासाठी एक ठराविक रक्कम भत्ता म्हणून दिली जाते. मात्र, ती रक्कम वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाला देण्यात आलेली नाही. यामुळे महिला खेळाडूंना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

बीसीसीआयचा भोंगळ कारभार..! पैसे न दिल्याने, भारतीय संघ अडकला परदेशात
author img

By

Published : Oct 31, 2019, 2:27 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. मात्र, या बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सद्या भारतीय महिला संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून बीसीसीआयने या खेळाडूंना भत्ता वेळेवर दिलेला नाही. यामुळे भारतीय महिला संघावर नामुष्कीची वेळ आली आहे.

भारतीय संघ विदेश दौऱ्यावर जात असताना बीसीसीआयच्या वतीने खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापनाला तेथील खर्चासाठी एक ठराविक रक्कम भत्ता म्हणून दिली जाते. मात्र ती रक्कम वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाला देण्यात आलेली नाही. यामुळे महिला खेळाडूंना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर महिला संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयला याबाबत सूचना मिळाल्यानंतर आता त्यांच्या खात्यामध्ये दैनिक भत्त्याची रक्कम डिपॉझिट केल्याचे वृत्त आहे.

खेळाडूंबाबत असे का घडले? याबाबत महिला क्रिकेट संघाचे सर्व कामकाज पाहणारे भारताचे माजी यष्टीरक्षक साबा करीम यांनी सांगितले की, 'काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या नव्या कार्यकारीणीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सर्व गोष्टीला थोडा उशीर झाला. दरम्यान, आता खेळाडूंना योग्य ती रक्कम पोचवण्यात आली आहे. यापुढे अशा चुका टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.'

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना हा १ नोव्हेंबरपासून होणार आहे. यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडीजला ४ दिवसांआधी पोहोचला आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचे मानसिक स्वास्थ बिघडले, अनिश्चित काळासाठी खेळणार नाही क्रिकेट

हेही वाचा - ICC T२० World Cup २०२० : अंतिम १६ संघ ठरले, भारत-पाकिस्तान सामना होणार...

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.