ETV Bharat / sports

टीम इंडियाची 'गुलाबी' सुरूवात, २२ नोव्हेंबरपासून कोलकात्यात पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना - गुलाबी रंगाचा बॉल वापरून कसोटी सामना

नोव्हेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत भारत-बांग्लादेश पहिला पिंक बॉल कसोटी सामना खेळणार आहेत. दोन्ही संघ २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकात्यामध्ये डे-नाईट कसोटी खेळतील. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला(बीसीबी) या दौऱ्यादरम्यान पिंक बॉल कसोटी सामन्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव बीसीबीने मान्य केला असून मंगळवारी त्याला अधिकृत मान्यता दिली.

ईडन गार्डन
author img

By

Published : Oct 29, 2019, 9:55 PM IST

कोलकाता - भारत आणि बांग्लादेश दरम्यान डे-नाईट कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकात्यामध्ये दोन्ही संघांमध्ये पिंक बॉल कसोटी सामना होणार असल्याची, माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.

कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर पहिला पिंक बॉल कसोटी सामना खेळवला जाणार आहे

जागतिक क्रिकेटमध्ये डे-नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. मात्र, भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच सामना होत आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुलाबी रंगाचा बॉल वापरून डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार असल्याने त्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला(बीसीबी) या दौऱ्यादरम्यान पिंक बॉल कसोटी सामन्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव बीसीबीने मान्य केला असून मंगळवारी त्याला अधिकृत मान्यता दिली.

हेही वाचा - मॅच फिक्सिंग ऑफर : शाकिबचे २ वर्षासाठी निलंबन, आयसीसीची कारवाई

सौरव गांगुलीकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे येण्यापूर्वी बीसीसीआयने पिंक बॉलने कसोटी खेळण्यास टाळाटाळ केली होती. मात्र, अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गांगुलीने कर्णधार विराट कोहलीबरोबर पिंक बॉलने क्रिकेट खेळण्यावर चर्चा केली. गांगुलीच्या या प्रस्तावाला विराटने मंजुरी दिल्यानंतर गांगुलीने या सामन्याची अधिकृत घोषणा केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.