मोहाली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये टी-२० मालिकेतील दुसरा सामना मोहालीच्या मैदानात रंगला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा युवा गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत आफ्रिकेला १४९ धावांमध्ये रोखले.
हेही वाचा - ४० वर्षीय झहीर खानची मैदानात वापसी, 'या' संघासाठी करणार गोलंदाजी
फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघानेही चांगली फलंदाजी केली. कर्णधार क्विंटन डी कॉकने अर्धशतक झळकावत मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्याची आक्रमक फलंदाजी भारतासाठी धोकादायक ठरत होती. तेव्हा १२व्या षटकामध्ये नवदीप सैनीच्या चेंडूवर विराट कोहलीने हवेत उडी मारत डी कॉकचा अप्रतिम झेल घेतला. सेट फलंदाज डी कॉक बाद झाल्याने, आफ्रिकेचा संघ निर्धारीत २० षटकात १४९ धावा करु शकला.
-
MUST WATCH: Superman @imVkohli takes a stunner 👏
— BCCI (@BCCI) September 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full video here 📹📹https://t.co/VmJaxRF6P3 @Paytm #INDvSA pic.twitter.com/k6TgD187Ne
">MUST WATCH: Superman @imVkohli takes a stunner 👏
— BCCI (@BCCI) September 18, 2019
Full video here 📹📹https://t.co/VmJaxRF6P3 @Paytm #INDvSA pic.twitter.com/k6TgD187NeMUST WATCH: Superman @imVkohli takes a stunner 👏
— BCCI (@BCCI) September 18, 2019
Full video here 📹📹https://t.co/VmJaxRF6P3 @Paytm #INDvSA pic.twitter.com/k6TgD187Ne
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटची 'कांस्य' पदकावर मोहर, ऑलिम्पिकचे तिकीट पक्के
दरम्यान, आगामी विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात खराब क्षेत्ररक्षणामुळे विराट कोहली काही काळ संतापला होता. कोहलीचा हा रुद्रावतार पाहून मैदानावरील प्रेक्षकही अवाक झाले.