ETV Bharat / sports

सतर्क राहा, खरा संघ आता येतोय; पीटरसनने टीम इंडियाला डिवचले

केविन पीटरसनने एक ट्विट केले आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याने हे ट्विट खास हिंदीतून केले आहे. यातून त्याने भारतीय संघाला इशारा दिला आहे.

india vs england series kevin pietersen tweet in hindi says team india not to celebrate more
सतर्क राहा, खरा संघ आता येतोय; पीटरसनने टीम इंडियाला डिवचले
author img

By

Published : Jan 20, 2021, 10:39 AM IST

मुंबई - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करुन बॉर्डर-गावसकर चषकावर नाव कोरले. चार सामन्याची मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर भारतासमोर आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधीच इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन याने भारतीय संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे.

केविन पीटरसनने एक ट्विट केले आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याने हे ट्विट खास हिंदीतून केले आहे. यातून त्याने भारतीय संघाला इशारा दिला आहे.

भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करावा. कारण हा विजय सर्व अडचणीवर मात करून मिळाला आहे. परंतु खरा संघ काही आठवड्यानंतर येत आहे. त्याला तुम्हाला तुमच्या घरात पराभूत करावे लागणार आहे. सतर्क रहा. दोन आठवड्यात जास्त जल्लोष करण्यापासून सावध राहा, अशा आशयाचे ट्विट पीटरसनने केले आहे. ट्विटच्या पीटरसनने हसण्याचे इमोजीही जोडले आहेत.

  • India 🇮🇳 - yeh aitihaasik jeet ka jashn manaye kyuki yeh sabhi baadhao ke khilaap hasil hui hai

    LEKIN , ASLI TEAM 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 😉 toh kuch hafto baad a rahi hai jisse aapko harana hoga apne ghar mein .

    Satark rahe , 2 saptaah mein bahut adhik jashn manaane se saavadhaan rahen 😉

    — Kevin Pietersen🦏 (@KP24) January 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.

हेही वाचा - टीम इंडियासमोर आता इंग्लंडचे आव्हान, असे आहे वेळापत्रक

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर विश्वास बसत नाही; रिकी पाँटिंगला बसला धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.