ढाका - बांगलादेशचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यातून बांगलादेशचा सलामीवीर तमिम इक्बालने माघार घेतली आहे. तमिम लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याने, त्याने या दौऱ्यातून माघार घेतली असून त्यांच्या ठिकाणी संघात डावखुरा फलंदाज इम्रूल कायेस याची निवड केली आहे.
बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यात सुरूवातीला तीन टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभय संघात २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. टी-२० मालिकेची सुरूवात ३ नोव्हेंबरपासून दिल्ली येथे होणार आहे. या मालिकेतील दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे राजकोट आणि नागपूर येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर बांगलादेश संघ भारताविरुद्ध इंदूर (१४ ते १८ नोव्हेंबर) आणि कोलकाता (२२ ते २६ नोव्हेंबर) येथे दोन कसोटी सामनेही खेळणार आहे.
टी-२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ -
- शकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, इम्रूल कायेस, सौम्या सरकार, मोहम्मद नईम, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह, अफिफ होसेन, मोसाद्देक होसेन, अमिनूल इस्लाम, अराफत सनी, अल-अमिन होसेन, मुस्तफिझुर रहमान आणि शफिउल इस्लाम.
हेही वाचा - शाकिबवर होणार त्याच्याच मंडळाकडून कारवाई
हेही वाचा - जेव्हा पंतप्रधान क्रिकेटपटूंसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात धावतात