मुंबई - आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सामन्यांचे ठिकाण आणि तारखा यांची घोषणा करण्यात आली. भारतीय संघ या दौऱ्यात एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. त्यापैकी उभय संघात मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) येथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात २५ हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हटले जाते. या बॉक्सिंग डे कसोटीसाठी एमसीजीने स्टेडियमच्या क्षमतेचा चौथा भाग प्रेक्षकांसाठी ठेवला आहे.
२०१८-१९मध्ये जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला दौरा केला होता, तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली होती. यंदा ऑस्ट्रेलिया दौर्यावर, भारताला २७ नोव्हेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१ या कालावधीत तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला कसोटी सामना - १७ ते २१ डिसेंबर (अॅडलेड)
- दुसरा कसोटी सामना (बॉक्सिंग डे ) - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
- तिसरा कसोटी सामना - ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२१ (गाबा)
(पहिला कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाणार आहे)