बेळगाव - भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' संघात खेळण्यात येत असलेल्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत 'अ' संघाने १० विकेट राखून विजय मिळवलाय. या विजयासह भारताने वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. यापूर्वी झालेल्या पहिल्या वनडेत भारताने ४८ धावांनी विजय मिळवला होता.
या सामन्यात भारत 'अ' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या संघावे निर्धारीत ५० षटकामध्ये ७ विकेट गमावत २४२ धावा करत्या आल्या. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ३३.३ षटकांमध्ये बिनबाद विजय साजरा केला. भारताचे सलामीवीर ऋतुराज गायकवाडने १२५ तर शुभमन गिलने १०९ धावांची शतकी खेळी करत संघाला १० विकेटने दणदणीत विजय मिळवून दिला.
पुण्याच्या ऋतुराज गायकवाडचे मालिकेतील सलग दुसरे शतक
या मालिकेत ऋतुराज गायकवाडने आपले दुसरे शतक साजरे केले. यापूर्वी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऋतुराजने १३६ चेंडूत १८७ धावांची खेळी साकारली होती. तर आजच्या सामन्यात १२५ धावांची खेळी साकारत, भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ऋतुराज हा या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. २० लाखांची बोली लावत चेन्नईने त्याला संघात घेतले आहे.