ETV Bharat / sports

IND vs AUS : टीम इंडियाची घोषणा; रोहितचे पुनरागमन, नवदीप सैनीचे पदार्पण

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. अंतिम ११ मध्ये उपकर्णधार रोहित शर्मा आणि नवदीप सैनीचा समावेश करण्यात आला आहे.

IND vs AUS: India announces playing XI against Australia
IND vs AUS : रोहितचे पुनरागमन; नवदीप सैनीचे पदार्पण
author img

By

Published : Jan 6, 2021, 1:37 PM IST

सिडनी - ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. अंतिम ११ मध्ये उपकर्णधार रोहित शर्मा आणि नवदीप सैनीचा समावेश करण्यात आला आहे. नवदीप सैन या सामन्यातून कसोटी पदार्पण करेल. तर मोठ्या विश्रांतीनंतर रोहित मैदानात दिसणार आहे. पहिल्या दोन सामन्यात खराब कामगिरी करणारा सलामीवीर मयांक अगरवालला संघातून वगळण्यात आले आहे.

मालिका बरोबरीत

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. तिसरी कसोटी सिडनी येथे होणार आहे. दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्यास उत्सुक आहेत. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. तर दुसरा कसोटी सामन्यात भारताने कमबॅक करत ऑस्ट्रेलियावर मात केली होती.

अशी आहे टीम इंडीया

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, एम. सिराज आणि नवदीप सैनी.

हेही वाचा - कसोटी संघाची जर्सी परिधान करणे अभिमानास्पद, पुढील आव्हानासाठी तयार; नटराजनचे ट्विट

हेही वाचा - IND VS AUS : वॉर्नर तिसरी कसोटी खेळणार का?, टिम पेनने दिले 'हे' उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.